esakal | चक्‍क देवीसमोर गुडघे टेकले होते कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेबाने! वाचा कुठे आहे मंदिर
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangzeb was kneeling in front of the goddess read full story

बादशहा काही माघार घेण्याच्या पवित्र्यात नसल्याचे पाहून गावकऱ्यांनी मंदिरात जाऊन देवीची आराधना केली. ज्यांचे कोणी नाही ऐकत त्याचे देव ऐकतो असतो असे म्हणतात ना... म्हणूनच देवीने त्यांची आराधना ऐकली. मंदिर तोडायला आलेल्या सैनिकांवर अचानक मधमाशांच्या झुंडीने हल्ला चढविला.

चक्‍क देवीसमोर गुडघे टेकले होते कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेबाने! वाचा कुठे आहे मंदिर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : भारत आणि मंदिरांचा फार जुना इतिहास आहे. इथल्या प्रत्येक मदिरांची आपली वेगळी ओळख आहे. इतिहासाची साक्ष देणारे हे मंदिर आजही उभे आहेत. भारतात अशी कितीतरी मंदिरे आहेत जी इतरांपेक्षा खूपच वेगळी आहेत. कुठे सोनं, तर कुठे देवीदेवतांचा वास, तर कुठे साक्षातकार पाहायला मिळतो. आपल्यासह गतकाळातील आठवणी साठवून ही मंदिरे आजही पाय रोवून उभी आहेत. याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. असेच एक देवीचे मंदिर आहे जिथे खुद्द क्रूर शासक औरंगजेबाला आपले गुडघे टेकावे लागले होते. चला तर जाणून घेऊया या मंदिराबद्दल...

राजस्थानमधील जयपूरपासून १२० किलो मिटर अंतरावर जीण माता मंदिर आहे. हिंदू द्वेषाने भरलेल्या मुघल बादशहा औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी सैनिकांना आज्ञा दिली. आज्ञा मिळताच सैनिक मंदिर तोडण्यासाठी जयपूरच्या दिशेने निघाले. भल्या मोठ्या सैनिकांना पाहून गावकरी घाबरून गेले होते. त्यांनी भीतभीत मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना खूप विनवणी केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाल नाही.

हेही वाचा - सावधान! पायी जाणाऱ्या मुलींनो, जरा सांभाळून..काय आहे प्रकरण... वाचा सविस्तर

बादशहा काही माघार घेण्याच्या पवित्र्यात नसल्याचे पाहून गावकऱ्यांनी मंदिरात जाऊन देवीची आराधना केली. ज्यांचे कोणी नाही ऐकत त्याचे देव ऐकतो असतो असे म्हणतात ना... म्हणूनच देवीने त्यांची आराधना ऐकली. मंदिर तोडायला आलेल्या सैनिकांवर अचानक मधमाशांच्या झुंडीने हल्ला चढविला. मधमाशांच्या झुंडीने हल्ला चढविल्यानंतर घाबरलेल्या सैनिकांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने तेथून पळ काढला. त्याच्या सैनिकाला हे मंदिर पाडता आले नाही.

सव्वा मण तेल अर्पण करण्याच वचन

मंदिरावर हल्ला चढवल्यानंतर देवी नाराच झाली की काय औरंगजे चांगलाच आजारी पडला. अनेक वेदांकडून औषधोपचार केल्यानंतरही त्याचा आजार काही कमी होत नव्हता. देवीच्या अवकृपेमुळेत तुझ्यावर ही परिस्थिती ओढवल्याचे कोणीतरी त्याला सांगितले. मात्र, तो हे माणायला तयार नव्हता. आजार बरा होत नसल्याचे पाहून कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेब देवीची माफी मागायला मंदिरात पोहोचला. त्याने जीण मातेची मनापासून माफी मागितली आणि मंदिरातील दिवा अखंड तेवत राहण्यासाठी दर महिन्याला सव्वा मण तेल अर्पण करण्याचं वचन दिले.

अधिक माहितीसाठी - जिच्या काठावर वसले आहे अख्खे नागपूर त्या 'नाग नदीचा' इतिहास माहिती आहे का? नाही ना. मग जाणून घ्या

ठोस पुरावे नाहीत

काही दिवसांतच औरंगजेब बादशाह ठणठणीत झाला. म्हणतात तेव्हापासूनच मुघल बादशहाची या मंदिरावर श्रद्धा जडली. आता ही गोष्ट किती खरी आणि किती खोटी याबद्दल मात्र ठोस पुरावे नाहीत. विशेष म्हणचे या मंदिरात बाराही महिने दिवा अखंड तेवत असतो. ओरंगजेबाने मंदिरातील दिवा अखंड तेवत राहण्यासाठी दर महिन्याला सव्वा मण तेल अर्पण करण्याचं वचन दिल्यामुळेच बाराही महिने दिवा अखंड तेवत असतो का? याचे उत्तर मात्र कुणाकडेही नाही.

वहिनीसोबत पैज हरली जीण माता

जीण मातेचा जन्म घांघू गावातील एका चौहान वंशाच्या राजा घंघ यांच्या घरी झाला. मातेचा हर्ष नावाचा एक मोठा बंधू होता. दोन्ही भावंडांचा एकमेकांवर जीव होता. जीण मातेला शक्तीचे आणि हर्ष याला भगवान शंकराचे रूप मानले जाते. एकदा जीण माता वहिनीसह पाणी भरण्यासाठी सरोवराकाठी गेली होती. तेव्हा दोघांत वाद झाला की, हर्ष सर्वात जास्त कोणावर प्रेम करतो? दोघींनी अशी पैज लावली की जिच्यावर डोक्यावरील घडा हर्ष अगोदर उतरवेल, त्यावरून हे स्पष्ट होईल की हर्ष सर्वात जास्त कोणावर प्रेम करतो. हर्षने सर्वात आधी पत्नीच्या डोक्यावरील मडके उतरवले आणि ही पैज जीण माता हरली. यामुळे नाराज होऊन जीण माता अरावलीच्या पर्वतरांगेतील काजल शिखरावर बसली आणि घोर तप करू लागली.

क्लिक करा - सत्तावीस वर्षीय युवक स्मशानघाटासमोरून गाडी ढकलत घेऊन जात होता, पुढे...

जागरण करण्याची आणी दान देण्याची प्रथा

हर्ष समजूत घालायला गेला. परंतु, जीण माता परतली नाही आणि देवाच्या तपामध्ये लीन राहिली. बहिणीची समजूत काढण्यासाठी हर्षही भैरव तपस्येमध्ये लीन झाला. आता या दोघांची तपोभूमी जीणमाता धाम आणि हर्षनाथ भैरवाच्या रूपात प्रसिद्ध आहे. जीण माता मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध ते नवमीपर्यंत दोन यात्रा असतात. दरम्यानच्या काळात भाविक मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. केवळ राजस्थानातीलच नाही तर भारतातील भाविकांमध्ये जीण मातेबद्दल अपार श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात येथे रात्री जागरण करण्याची आणी दान देण्याची प्रथा आहे.

संपादन - नीलेश डाखोरे