धक्कादायक ः परिचारिकांसह सफाई कामगार महिलेसह सुरक्षा बलाचा जवान कोरोनाबाधित

Shocking: Corona of the security forces with a nurse and a cleaning worker
Shocking: Corona of the security forces with a nurse and a cleaning worker

नागपूर : कोरोनाच्या रुग्णांवर सातत्याने उपचार करावे लागल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) तिशी-बत्तीशी वयातील दोन परिचारिकांसह एका सफाई कामगार महिला आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानुसार उघडकीस आले आहे. यामुळे मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे. परिचारिका आणि सुरक्षा बलाच्या जवानाला पेइंग वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. तर सफाई कामगार महिलेस मात्र जनरल वॉर्डात दाखल केले आहे. 


उपराजधानीत कोरोनाचे 1,099 रुग्ण आहेत. आतापर्यंत मेडिकलमध्ये 400 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांवर उपचार झाले आहेत. यातील अडीचशेवर रुग्ण सध्या मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. यांच्यावर उपचार करताना डॉक्‍टर, परिचारिका, सफाई कामगार, अटेंडंट इमानेइतबारे सेवा देत आहेत. मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वी वॉर्ड 47 मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना हाताळताना योग्य ती खबरदारी घेतली नाही.

सुपर स्पेशालिटीत एन्जिओग्राफी झालेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी एक जण बाधित आढळल्यामुळे परिचारिकांसह सफाई कामगार महिलेस रविभवन येथील विलगीकरणात पाठवले होते. येथून घेण्यात आलेल्या नमुन्यात ते बाधित असल्याचे आढळले. यामुळे त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यता आले. मेडिकलमध्ये दोन परिचारिकांसह एक सुरक्षा बलाचा जवान पेइंग वॉर्डात सध्या दाखल आहे. मात्र, सफाई कामगार महिलेच्या नशिबी मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक 49 आला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर सेवा देण्यात डॉक्‍टर, परिचारिका तसेच इतरही आरोग्य कर्मचारी यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत असते. 

घरचे असतात काळजीत 

परिचारिका आणि डॉक्‍टरांना बाधा झाल्यास त्यांना उच्च दर्जाची सेवा मिळते. मात्र, इतर कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय लावला जातो. साऱ्या कोरोनाबाधित परिचारिकांच्या घरचे काळजी करीत आहेत. कोरोना वॉर्डात ड्यूटी देताना मुला-मुलींना आम्हाला भेटायचे असते. परंतु, आम्ही त्यांना येथे येऊ देत नाहीत. त्यामुळे आम्ही आमची परस्परांची काळजी घेतो, अशी प्रतिक्रिया कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्या कोरोना वारियर्सनी दिली. 

मधुमेहासह अनेक आजार 

सेवेवर असलेल्या अनेक मधुमेही परिचारिका, कार्यरत असून, त्यांना रक्तदाबही आहे. अशा कर्मचाऱ्यांना कोरोना वॉर्डातील सेवेपासून दूर ठेवण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु, ते आदेश कितपत पाळले जात आहेत, हे गुलदस्त्यात आहे. सलग ड्यूटी दिल्यामुळेच कोरोना झाल्याची चर्चा परिचारिकांमध्ये आहे. मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्‍टर आणि परिचारिकांच्या निवासाची व्यवस्था रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात तसेच अतिथीगृहात करण्यात येते. परंतु, तेथे सुविधा पुरविण्यात येत नसल्याची तक्रार पुढे आली आहे. 


कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. रोटेशन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत आहे. परिचारिका, अटेंडंट यांना बाधा झाल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. सर्वांची प्रकृती बरी आहे. 
डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com