मनुष्यबळात दुपटीची तफावत, खाटांचा भार मात्र समान : मेयो-मेडिकलमधील स्थिती

केवल जीवनतारे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना मेडिकलमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी डॉक्टर व इतर असे १०३ जणांचे मनुष्यबळ असताना ६०० खाटा आहेत. तर मेयोत ५५ जणांचे मनुष्यबळ असतानाही कोरोनासाठी ६०० खाटा आहेत. 

-मेयोत ५५ जण सांभाळतात ६०० खाटांचा भार 
-मेडिकलमध्ये १०३ जण असूनही खाटा मात्र ६०० 

नागपूर : उपराजधानीत पहिला कोविड रुग्ण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाला. योग्य उपचारातून त्याने कोरोनावर मात केली. यानंतर मेयोवर कोरोना रुग्णांचा भार दर दिवसाला वाढत आहे. मेयो रुग्णालयात ५५ जणांचे मनुष्यबळ असूनही येथील कोविड हॉस्पिटलमध्ये ६०० खाटा आहेत. दुसरीकडे मेयोपेक्षा दुप्पट मनुष्यबळ मेडिकलमध्ये आहे. तेथे १०३ जण काम करीत असूनही तेथेही ६०० खाटाच तयार करण्यात आल्या. असे असतानाही कोविड रुग्णांना थेट मेयोत रेफर करण्याचे धोरण मेडिकल प्रशासनाकडून राबवण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. 

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

अकोला येथील डायलिसिसवर असलेल्या कोरोनाबाधितावर उपचारासाठी मेडिकलमध्ये रेफर केले गेले. त्याला परस्पर मेयोत पाठवण्यात आले. अशी अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना मेडिकलमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी डॉक्टर व इतर असे १०३ जणांचे मनुष्यबळ असताना ६०० खाटा आहेत. तर मेयोत ५५ जणांचे मनुष्यबळ असतानाही कोरोनासाठी ६०० खाटा आहेत. 

संचालकांनी लक्ष द्यावे 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने मेडिकल-मेयोतील कोविड हॉस्पिटलमध्ये समान पदे देत समान खाटा देण्याची आवश्यकता होती. त्यामुळे मनुष्यबळ अधिक असल्याने मेडिकलमध्ये खाटा वाढवण्यासाठी संचालकांनी लक्ष द्यावे, असे मत व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking : Double the difference in manpower, The bed load is the same