धक्कादायक ः दररोज होतोय नागपुरात कोरोनाने मृत्यू 

Shocking: Every day death happens in Nagpur by corona
Shocking: Every day death happens in Nagpur by corona

नागपूर : मधुमेह, उच्च रक्तदाब, श्‍वसन विकार, ह्दयविकार अशा गंभीर आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना कोरोना विषाणू लगेच कवेत घेत आहे. त्याला उपचारासाठी वेळच देत नाही. जुलै महिन्याच्या 15 दिवसात 15 जण कोरोनाच्या बाधेने मृत्यू पावले. बुधवारी मेडिकलमध्ये 63 वर्षी व्यक्ती कोरोनाच्या बाधेने दगावला असून नागपुरात 40 व्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 520 वर पोहचला आहे. विशेष असे की, मेयो, मेडिकलसह कोविड सेंटरमध्ये सुमारे 900 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 
बुधवारी दगावलेल्या कोरोनाबाधित व्यक्ती मुळचा यवतमाळ येथील रहिवासी आहे. ऍनलॉकच्या काळात हा व्यक्ती चंद्रपूर, वर्धा, नागपूर येथे सर्रास फिरत होता. या प्रवासादरम्यान कोण्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला सर्दी, खोकला व इतर कोरोनासदृश्‍य लक्षणे आढळली. 14 जुलैरोजी मेडिकलच्या कोरोना वॉर्डात भरती करण्यात आले. पोटाचा विकार असल्याचेही डॉक्‍टरांनी केलेल्या निदानातून पुढे आले. त्याच्या घशातील नमूने तपासणीतून त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. 


त्याला वाचविण्यासाठी डॉक्‍टरांनी बरेच प्रयत्न केला. 5 जुलै रोजी कोरोनाचा रुग्ण मृत्यू पावल्यानंतर 6 जुलैरोजी मृत्यूने उसंत दिली. मात्र 7 जुलैपासून सातत्याने कोरोनाचे मृत्यूसत्र सुरू झाले. ते आजही कायम आहे. 8 जुलैरोजी एकाच दिवशी 3 मृत्यूंच्या नोंदीचा विक्रमही नागपूरात झाला. दर दिवशी होणाऱ्या कोरोनाच्या मृत्यूमुळे प्रशासन हादरले आहे. त्यातच दिवसभरात आणखी 74 जण कोरोनाबाधित आढळून आले होते. उपराजधानीत बाधितांची संख्या 2550 झाली आहे. तर 1600 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

15 दिवसात 1 हजार 75 कोरोनाबाधित 

1 ते 30 जून या महिनाभराच्या कालावधीत उपराजधानीत कोरोना विषाणूचे अवघे 963 रुग्ण वाढले. मात्र एक जुलैपासून कोरोनाच्या प्रसाराची गती प्रचंड वाढली आहे. 15 दिवसात 1 हजार 75 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष असे की, शहरातील झोपडपट्ट्यांपासून तर शहरातील विविध अपार्टमेंटमध्ये, शंभरपेक्षा अधिक वस्त्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत कोरोनाने 500 रुग्ण झोपडपट्ट्यांमधील आहेत. कोरोनाबाधिता प्रादुर्भाव उपराजधानीसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. त्यातच शहरात रॅपिड चाचणीचा वापर होत असल्याने चार दिवसांमध्ये 8 हजार चाचण्यांचा विक्रम झाला आहे. 

गावखेड्यातील आकडा पाचशेवर 

शहरात कोरोनाबाधितांचा आकडा चांगलाच फुगला आहे. त्यापाठोपाठ नागपूर ग्रामीण भागातही कोरोनाचा चांगलाच शिरकाव झाला आहे. सर्वाधिक बाधितांची संख्या हिंगणा तालुक्‍यात आहे. हिंगणा तालुक्‍यात 100 जण कोरोनाच्या विखळ्यात सापडले असून लोकमान्य नगर (डिगहोह) येथे एकाचा मृत्यू झाला आहे. हिंगण्यापाठोपाठ कामठी तालुक्‍यात 61 जण बाधित आढळून आले असून कन्हान येथे एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नागपूर तालुक्‍यातील 36 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. काटोल तालुक्‍यातही 36जण कोरोनाबाधित आढळले. कळमेश्‍वरमध्ये 14 तर सावनेरमध्येही 12 जणांना कोरोना झाला होता.रामटेक तालुक्‍यात तिघांना तर उमरेड तालुक्‍यात एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. राज्य राखीव पोलिस दलाचे आतापर्यंत 15 तर कामठीतील 

"जुलै' महिन्यातील मृत्यू 

-5 जुलै रोजी तेलंगखेडी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-7 जुलै रोजी भांडेवाडी येथील 45 वर्षीय तरुणाचा मृत्यू 
-8 जुलै रोजी मध्य प्रदेशातील सिवनी येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-8 जुलै रोजी अमरावती येथील 71 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-8 जुलै रोजी धरमपेठ टांगा स्टॅड येथील 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-9 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-9 जुलै रोजी अमरावती येथील 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-10 जुलै रोजी हंसापुरी येथील 62 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू 
-10 जुलै रोजी मनीषनगर रेणुका येथील 49 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-12 जुलै रोजी नाईकवाडी गुप्ता चौकातील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-12 जुलै रोजी अमरावती येथील 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-13 जुलै रोजी रामेश्‍वरी येथील 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-13 जुलै रोजी भंडारा येथील 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-14 जुलै रोजी मनीषनगर येथील 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
-15 जुलै रोजी यवतमाळ येथील 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com