रुग्ण ६० टक्के घटले, मृत्यू वाढले

Shocking : In the OPD, 60% patients decreased in Meyo
Shocking : In the OPD, 60% patients decreased in Meyo


मेयोतील कोरोना काळातील वास्तव; निधी खर्च करण्यात अपयश

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) बाह्यरुग्ण विभागात ६० टक्के रुग्णांची संख्या घटली आहे. त्या तुलनेत मृत्यूचा टक्का मात्र वाढला आहे.
विशेष असे की, मेयो रुग्णालयाला कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह, जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून मिळालेला निधी १०० टक्के खर्च करण्यात अपयश आले. २५ टक्के निधी शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे.

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

२०१९ मध्ये ७ लाख २७ हजार ८७ रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ऑगस्ट २०२० पर्यंत २ लाख ३३ हजार ९६७ रुग्णांची नोंद झाली आहे. आठ महिन्यात रुग्णसंख्या निम्यापेक्षा अधिक संख्येत घट झाल्यानंतर दाखल झालेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मेयो रुग्णालयात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत बाह्यरुग्णांप्रमाणे आंतररुग्ण विभागातही घट झाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळवलेल्या माहिती अधिकारातून पुढे आली आहे. मेयोत ३६ हजार ९०२ रुग्ण विविध वॉर्डात भरती करून त्यांच्यावर उपचार केले गेले. तर १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२० या आठ महिन्यांच्या कालावधीत हा आकडा खाली घसरला. आंतररुग्ण विभागात २०२० सालाच्या आठ महिन्यात १५ हजार ८१३ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. मेयो रुग्णालयाला कोरोना काळात जिल्हा नियोजन समितीकडून यंत्रसामुग्रीसाठी तसेच जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून यंत्र, औषधी, आहारासाठी, खनिकर्म खात्याकडून यंत्रसामग्री व सर्जिकल साहित्यासाठी, योजनेतर औषधी व सर्जिकल साहित्यासाठी, योजनांतर्गत यंत्रसामग्रीसाठी एकूण २३ कोटी २४ लाख ४११ रुपये उपलब्ध करून देण्यात आले. यातील १७ कोटी ३१ लाख १११ रुपये खर्च झाले आहे. तर ५ कोटी ९३ लाख रुपये अखर्चीत आहे. परंतु हा निधी खर्च करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मेयो प्रशासनाचे म्हणणे आहे.

साडेतीन हजार बाधितांवर उपचार

मार्च- २०२० पासून नागपूरच्या मेयोतही कोविड रुग्णालय सुरू झाले. ३१ ऑगस्टपर्यंत मेयोच्या कोविड वॉर्डात साडेतीन हजारावर कोरोनाबाधितांवर रुग्णांवर उपचार झाले. त्यात २ हजार ९६ पुरुष, १ हजार ४२८ महिला, १९० मुलांचा समावेश आहे. पैकी १ हजार २८६ पुरुष, १ हजार ४४ महिला, १२५ मुलांना उपचारानंतर सुट्टी दिली गेली. तर २८५ पुरुष, १६८ महिलांचे कोरोनाने मृत्यू नोंदविले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com