Video : आता देता येणार जेवण; मात्र प्रकृती धोक्‍याबाहेर नाही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पीडिता मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका आहे. नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना युवक पाठीमागून दुचाकीवर आला. त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. गाडीतील पेट्रोल काढून सोबत कपडा गुंडाळून आणलेल्या टेंभावर टाकले. त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून पळ काढला होता. 

नागपूर : हिंगणघाटमध्ये घडलेल्या अमानवीय घटनेतील पीडिता असह्य वेदना सहन करीत आहे. तिच्यावर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पीडिता उपचारांना प्रतिसाद देत असली तरी पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले होते. शुक्रवारी पीडितेच्या नाकातून कृत्रिम अन्न नलिका टाकण्यात आली. त्यामुळे तिला अन्न देणे सोईचे होणार आहे. उद्यापासून तिला नाकातील अन्न नलिकेमार्फत जेवण दिल जाणार असल्याचे त्वचा रोगतज्ञ डॉ. दर्शन रेवनवार यांनी सांगितले. 

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या नंदोरी चौक परिसरात दारोडा येथील प्राध्यापिका तरुणीच्या अंगावर माथेफिरू विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले व तो तेथून पसार झाला होता. त्याला चार तासांच्या आत पोलिसांनी बुटीबोरी जवळील टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले होते. घटनेनंतर लगेच पीडित प्राध्यापिकेला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

काय आहे या लिंकमध्ये? - हॅलोऽऽ हॅलोऽऽ, तुकाराम मुंढे यांच्या तावडीतून कसे सुटायचे, सांगता का?

पीडिता मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका आहे. नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना युवक पाठीमागून दुचाकीवर आला. त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. गाडीतील पेट्रोल काढून सोबत कपडा गुंडाळून आणलेल्या टेंभावर टाकले. त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून पळ काढला होता. 

त्याचवेळी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि या मार्गाने जाणाऱ्या इतर युवकांनी आग विझवून तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तरुणी गंभीर भाजल्याने नागपूर येथे हलविण्यात आले होते. तेव्हापासून तिच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील सात दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. पीडितेच्या डाव्या हाताच्या बोटांत सुधार होत असल्यातरी उजव्या हाताची बोट अद्यापही क्रिटिकल असल्याचे डॉ. दर्शन रेवनवार यांनी सांगितले. 

कृत्रिम अन्न नलिका 
शुक्रवारी ऑपरेशन केल्यानंतर पीडितेच्या नाकातून कृत्रिम अन्न नलिका टाकली आहे. त्यामुळे तिला अन्न देणे सोईचे होणार आहे. उद्यापासून तिला अन्न नलिकेमार्फत जेवण दिल जाणार आहे. ती उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, तिची प्रकृती अद्यापही धोक्‍याबाहेर नाही. 
- डॉ. दर्शन रेवनवार, 
त्वचा रोगतज्ञ

रक्‍तदाब औषधांमुळे सामान्य 
तरुणीचा रक्‍तदाब कमी जास्त होत असून, ही चांगली बाब नाही. सध्या तिचा रक्‍तदाब औषधांमुळे सामान्य आहे. महिनाभरात तिच्यावर वेगवेगळी शस्त्रक्रिया करावी लागणार आहेत. अजूनपर्यंत कृत्रिम श्‍वासोश्‍वासची गरज भासली नाही. मात्र, आम्ही तयारी करून ठेवलेली आहे. 
- डॉ. राजेश अटल, 
क्रिटिकल केअर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Short response to the treatment of the victim in Hinganghat