एकदाचे उघडले बारचे शटर! मात्र बसून पिण्यास मनाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

आता बिअरबारमधून दारू विक्री होणार आहे. शासनाच्या सहमतीनंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बार सुरू करण्यास परवानगी दिली. सव्वा दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील बिअरबारचे शटर उघडले आहे.

नागपूर : गेल्या सव्वा दोन महिन्यापासून बंद असलेले बिअरबारचे शटर एकदाचे उघडले असून दारू प्रेमींची अडचण दूर झाली आहे.
 जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बार सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर बिअरबार सुरू झाले आहेत. परंतु येथे बसून दारू पिता येणार नसल्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी वाईन शॉपसोबत बिअरबार बंद करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यात १८ मार्चपासून दारू विक्री बंद होती. सरकारच्या आदेशानंतर दारू विक्री सुरू करण्यात आली. शहरात घरपोच तर ग्रामीण भागात दुकानातून विक्रीस परवानगी आहे. आता बिअरबारमधून दारू विक्री होणार आहे. शासनाच्या सहमतीनंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बार सुरू करण्यास परवानगी दिली. सव्वा दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील बिअरबारचे शटर उघडले आहे. बिअर खराब होण्याची मुदत असते. बार बंद असल्याने या बिअर खराब होण्याची भीती आहे. यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. परंतु  बारमध्ये बसून दारू पिता येणार नाही. शहरी भागात घरपोच दारू विक्री होईल तर ग्रामीण भागात दुकानातून याची विक्री होईल. एमआरपीनुसारच याची विक्री होणार असून बार सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू राहतील.

सविस्तर वाचा - सामूहिक चाचणीचा निर्णय राज्याने घ्यावा
बंद करतेवेळी जो साठा बारमध्ये होता, त्यालाच विक्रीची परवानगी राहणार आहे. बार चालकांकडून आलेल्या अर्जानंतर आवश्यक तपासणी केल्यावरच त्यांना विक्रीस परवानगी देण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shutters of bar now open