Breaking : नागपुरात कोरोनाचा उद्रेक, या परिसरात आढळले तब्बल 60 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

मोमीनपुरा पसिरसात आतापर्यंत 242 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर नाईक तलाव- बांग्लादेश परिसरात दिडशेची मजल मारली आहे. यानंतर सतरंजीपुरा येथे 115 कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष असे की, पश्‍चिम नागुपारीतल शिवाजीनगर येथील 28 वर्षीय युवतीलाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे शिवाजीनगर परिसर सील करण्यात आला आहे. आठ दिवसांपुर्वीचा आकडा सहाशेवर होता.

नागपूर : उपराजधानीत दर दिवसाला नवीन वस्तीमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. एका परिसरात झालेल्या जंगी पार्टीनंतर शहरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट झाला आहे. या वस्तीमध्ये बुधवारी पहिल्या टप्प्यातच तपासणीतून 60 जणांना कोरोनाने विळख्यात घेतले असल्याचे उघड झाले.  

मोमीनपुरा पसिरसात आतापर्यंत 242 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर नाईक तलाव- बांग्लादेश परिसरात दिडशेची मजल मारली आहे. यानंतर सतरंजीपुरा येथे 115 कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष असे की, पश्‍चिम नागुपारीतल शिवाजीनगर येथील 28 वर्षीय युवतीलाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे शिवाजीनगर परिसर सील करण्यात आला आहे. आठ दिवसांपुर्वीचा आकडा सहाशेवर होता. मात्र आता हा आकडा चक्क 840 वर पोहचला असून नागपूर शहराने आता अकोल्यावरही मात केली असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. 

24 तासांत शंभरी पार
शहरात मागील 24 तासांमध्ये 103 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. बुधवारी पशुवैद्यक प्रयोगशाळेतून आलेल्या नवीन बाधितांमध्ये सारेच्या सारे कोरोनाबाधित हे नाईक तलाव आणि बांग्लादेश परिसरातील असल्यामुळे या भागातील सर्व वस्त्या सील करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 841 वर पोहचली. बुधवारी एम्समध्ये 50 रुग्ण उपचार घेत आहेत. मेयोत 82 तर उर्वरित 104 रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. याच गतीने रुग्ण बरे होत असल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. तीन महिन्यात 525 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

नागपुरमध्ये पॉश फ्लॅटमधील सेक्‍स रॅकेटवर छापा

शहरातील हे आहेत हॉटस्पॉट 

मोमीनपुरा : 242 
नाईक तलाव बांग्लादेश : 150 
सतंरजीपुरा : 114 
टिमकी भानखेडे : 51 
खलाशी लाईन : 25


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixty one corona positive patients found in nagpur