धक्कादायकच ! 60 हजार लोक बेरोजगार ?

factry
factry

 नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन केल्याने नागपूर शहर आणि इतर औद्योगिक वसाहतींमध्ये जवळजवळ 60  हजार लोक बेरोजगार झाल्याची धक्कादायक  माहिती पुढे आली आहे.
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पाऊण महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केले आहे.  नागपूरच्या  परिसरातील उद्योगांचे नुकसान झाले आहे . यामुळे उद्योजकांकडून उद्योग सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.       
 हिंगणा, बुटीबोरी आणि कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील हजारो उद्योग बंद आहेत. त्याचा फटका रोजगाराला बसला आहे.
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष (एमआयए) चंद्रशेखर शेगावकर म्हणाले, टाळेबंदी होण्यापूर्वी हिंगणा औद्योगिक क्षेत्रात १०५० युनिट कार्यरत होते आणि दररोजचे उत्पादन १८ ते २० कोटी रुपये होते. सध्या केवळ ३५ युनिट कार्यरत आहेत आणि एक ते दीड कोटी रुपयांच्या वस्तूंचे उत्पादन करतात. लॉकडाऊन होण्यापूर्वी हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात सुमारे ३० हजार नोकर्या उपलब्ध होत्या, पण सध्या ते केवळ एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (बीएमए) अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल म्हणाले, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ५५० युनिट आहेत. यापैकी केवळ २० ते २३ युनिट मुख्यत: अन्न प्रक्रिया, औषधनिर्माण व पॅकेजिंगमध्ये कार्यरत आहेत. लॉकडाऊन होण्यापूर्वी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात जवळपास २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होते. आता या संख्येत घट होऊन आकडा १,१०० वर आला आहे. दैनंदिन उत्पादन ३० कोटी रुपयांवरून घसरून ३  कोटींपर्यंत कमी झाले आहे.
फक्त पाच लहान युनिट कार्यरत                                                     कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात ८५ युनिट असून त्यातील सर्वात मोठे जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू) हे रंगीत स्टील शीटचे युनिट आहे. जेएसडब्ल्यू युनिटमध्ये जवळपास एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत, पण हे युनिट सध्या बंद आहे. कळमेश्वरमध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रात फक्त पाच लहान युनिट कार्यरत आहेत. एकूण रोजगार २६०० वरून ५०० पर्यंत खाली आला आहे आणि उत्पादन ५ कोटींवरून घसरून २० ते ३० लाखांपर्यंत आले आहे.
मिहान-सेझ भागातील युनिटमधील लुपिन फार्मासह अजून दोन कंपन्या सुरू असल्याची  माहिती  एमएडीसीच्या सुत्राने दिली. या औद्योगिक क्षेत्रात ७० युनिट आहेत आणि त्यातील २० माहिती तंत्रज्ञान (आयटी) युनिट आहेत. या युनिटमध्ये जवळपास ४,५०० लोक कार्यरत आहेत. बहुतेक आयटी घटकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com