कचरा रे कचरा, किती वाढला तुझा भाव; वजनासाठी केला जातो हा प्रकार...

Soil is mixed in the garbage truck of Nagpur
Soil is mixed in the garbage truck of Nagpur

नागपूर : शहरातील कचऱ्याची उचल करणाऱ्या कंपन्यांनी कचऱ्यामध्ये अनेक टन माती टाकून महापालिकेकडून आतापर्यंत 20 कोटी रुपये वसूल केले. कंपनी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रत्यक्ष पाहणीनंतर आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. 

शहरातील कचऱ्याची उचल करण्याचे कंत्राट दोन कंपन्यांना देण्यात आले आहेत. यात पाच झोनची जबाबदारी एजी एन्व्हायरो तर पाच झोनची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. या कंपन्या कचऱ्यात मातीचे मिश्रण करून महापालिककेडून कोट्यवधी रुपये वसूल करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. याप्रकरणी आमदार विकास ठाकरे यांनी भांडेवाडी येथे पाहणी केली. त्यांच्यासोबत नगरसेवक संजय महाकाळकर, माजी नगरसेवक प्रशांत धवड व प्रमोदसिंग ठाकूर उपस्थित होते.

27 जूनला कचरा गाडी क्रमांक एमएच 31-एफसी-4424, एमएच 31-एमसी 4425, एमएच 31 एफसी 4306 या वाहनांमध्ये माती भरण्यात येत असल्याची तक्रारी काही कर्मचाऱ्यांनी आमदार विकास ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे आमदार ठाकरे यांनी भांडेवाडी येथील वजन काट्यावर ही वाहने पकडली आणि वजनाची पावती चालकांकडून हस्तगत केली. ही वाहने डम्पिंग यार्डमध्ये गेल्यानंतर कचऱ्यात माती, गोटे, विटा आढळून आल्या. या वाहनांचे वजन 13 टन होते. 

वाहन चालकानेच जेसीबीच्या सहाय्याने कचऱ्यात माती टाकल्याचे सांगितले. गेल्या सात, आठ महिन्यांपासून हा प्रकरा सुरू असून दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत 20 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

तक्रारीनंतर चौकशी

कचरा गाडीची दोनदा तपासणी केली जाते. कचऱ्यात माती आढळून आल्यानंतर संबंधित कचरा गाडीचा क्रमांक आणि वजन यादीमधून वगळण्यात येते. आतापर्यंत वेगवेगळ्या क्रमांकाच्या 59 गाड्यांचे क्रमांक वगळण्यात आले आहेत. प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी केली जाईल, असे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com