Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत फार्महाऊसवर धाव घेऊन पंचनामा केला. तोपर्यंत घटनास्थळी देवळी पोलिसांचे एक पथक सुद्धा पोहोचले. पोलिसांना फार्महाऊसवरून आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यात. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही करवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार रेवचंद शिंगणजुडे, प्रकाश नागापुरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. 

वर्धा : नोकरीचे आमिष देत एका विवाहितेवर सहा जणांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वच सहाही आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेची शनिवारी (ता. 27) सायंकाळी उशिरा पोलिसांत नोंद करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला नोकरीचे आमिष देऊन मुलखतीच्या बहाण्याने सिंदी (रेल्वे) येथून सावंगी (मेघे) येथे बोलावण्यात आले. येथून तिला व पतीला कामानिमित्ताने सेलुसरा येथील शेतातील फार्महाऊसवर नेले. तिथे गेल्यावर सहा जण उपस्थित होते. पीडितेच्या पतीला बाहेरच बसवण्यात आले आणि महिलेला आतमध्ये बोलावण्यात आले. पतीला संशय आला असता आरोपींनी त्याला धमकी देऊन बाहेरच पकडून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर एक-एक करून सहा जणांनी आळीपाळीने महिलेवर बळजबरी केली.

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

या घटनेनंतर आरोपींनी महिला व पतीला कुठेही या प्रकाराची वाच्यता केली तर तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर महिलेच्या पतीने देवळी पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रकरण सावंगी पोलिसांच्या हद्दीत असल्याने पोलिसांनी त्याला सावंगीला जाण्यास सांगितले. त्यांनी सावंगी पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत फार्महाऊसवर धाव घेऊन पंचनामा केला. तोपर्यंत घटनास्थळी देवळी पोलिसांचे एक पथक सुद्धा पोहोचले. पोलिसांना फार्महाऊसवरून आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यात. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही करवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार रेवचंद शिंगणजुडे, प्रकाश नागापुरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

अधिक माहितीसाठी - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

आरोपींना ठेवले पोलिस कोठडीत

शेखर सुरेश चंदनखेडे (वय 24, रा. पवनार), लोकेश ऊर्फ अभिजित गजानन इंगोले (वय 24, रा. तुकाराम वॉर्ड), होमराज बाबाराव भोयर (वय 39, रा. धारपुरे ले-आउट सिंदी (मेघे), नितीन मारोतराव चावरे (वय 27), राहुल बनराज गाडगे (वय 28) दोन्ही रा. खरांगणा (गोडे) आणि पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (वय 26, रा. सिंदी (मेघे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

पवनारात सापडला पहिला आरोपी

घटनेतील मुख्य आरोपी म्हणून नाव असलेला शेखर चंदनखेडे याला पवनार येथून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून इतर आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली. शेखर याचे पवनार येथे हॉटेल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

सर्वच आरोपी 25 ते 30 वयोगटातील 
सेलसुरा येथे असलेल्या फार्महाऊसवर सामूहिक बलात्काराचा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींची शोध घेतला. प्रत्येक आरोपीचा सुगावा मिळताच सहाही जणांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले सर्वच आरोपी हे 25 ते 30 वयोगटातील असल्याचे पुढे आले. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 
- पीयूष जगताप, 
उपविभागीय पोलिस अधिकारी, वर्धा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang rape of a woman in Wardha