esakal | मुलगा आईच्या भेटीसाठी गावात आला, तिकडे नातीन निघाली पॉझिटिव्ह, नंतर...

बोलून बातमी शोधा

The son who came to visit the mother went corona positive

होमक्वारंटाइन असतानासुद्धा हा व्यक्ती मांगली येथे येऊन गेला. त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने मांगली येथील ग्रामस्थांची चिंता बळावली आहे. विशेष म्हणजे अमरनगरमध्ये राहणाऱ्या त्याच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

मुलगा आईच्या भेटीसाठी गावात आला, तिकडे नातीन निघाली पॉझिटिव्ह, नंतर...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवापूर (जि. नागपूर) : कोरोनाच्या भीतीपोटी बाहेरील व्यक्‍तींना गावात येण्यास काही गावकऱ्यांनी मनाई केली आहे. तरीही शहरी भागातून गावात जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने घरी जाण्यासाठी नागरिक कारणाच्या शोधात आहेत. हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागातूनही नागरिकांची ये-जा सुरूच आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. अशात एका हॉटस्पॉट ठरलेल्या भागातून एक व्यक्‍ती गावी गेल्याने पुढील प्रकार घडला... 

हिंगणा मार्गावरील अमरनगर भागात राहणारा व्यक्ती मागच्या आठवड्यात तालुक्‍यातील मांगली (जगताप) येथे आईला भेटण्यासाठी आला होता. एक दिवसाचा मुक्काम ठोकून दुसऱ्या दिवशी घरी परत गेला. या व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मांगली येथे खळबळ उडाली. ही व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली, त्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत.

हेही वाचा - प्रेमविवाहाचा करुण अंत; गर्भपात झाल्याने विवाहितेने केले असे...

"हायरिस्क' संशयित असलेल्या 19 जणांपैकी काहींना मांगली येथील सरकारी शाळेत तर काहींना होमक्‍वारंटाइन करण्यात आले. ही व्यक्ती भिवापूरलासुद्धा आली होती. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले फळ, भाजीपाला, चहाविक्रेत्यांसोबत पेट्रोल पंपावरील एकास क्‍वारंटाइन करण्यात आले असल्याचे समजते. 

मूळ मांगलीचा असलेला हा व्यक्ती हिंगणा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. तो अमरनगर परिसरात वास्तव्यास आहे. हा व्यक्ती ज्या कंपनीत कामाला आहे तेथील दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कंपनीतील इतर सर्वांना क्‍वारंटाइन करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या दोघांपैकी एक जण अमरनगरात वरील व्यक्‍तीच्या शेजारी राहत असल्याचे समजते.

अधिक माहितीसाठी - साडेतीन लाख द्या, अन्यथा व्हिडीओ करतो व्हायरल... विद्यार्थ्यांनी दिली विवाहितेला धमकी

होमक्वारंटाइन असतानासुद्धा हा व्यक्ती मांगली येथे येऊन गेला. त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने मांगली येथील ग्रामस्थांची चिंता बळावली आहे. विशेष म्हणजे अमरनगरमध्ये राहणाऱ्या त्याच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. एकाच घरातील वडील व मुलगी दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह असल्याने कुटुंबातील इतरांना क्‍वारंटाइन करून टेस्ट केली जात आहे. 

मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावातून गेला

शहरात राहणारा हा व्यक्‍ती घरीच क्‍वारंटाईन असताना आईला भेटण्यासाठी गावी आला होता. तो काही दिवस गावी राहणार होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आपलीही चौकशी होईल या भीतीने त्याने गावातून पळ काढला. मात्र, त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे.

क्लिक करा - "ते' दृष्य पाहून मजुराची गेली तळपायातली आग मस्तकात, केली शेतमालकाची हत्या, काय होते कारण...

मांगलीवर लक्ष केंद्रीत

मुलीचा कोरोना अहवाल मिळायच्या आधीच हा व्यक्‍ती मांगलीला आईच्या भेटीसाठी आला होता. त्यामुळे मांगली करांची चिंता चांगलीच वाढली आहे. तालुका आरोग्य विभागाच्या चमूंनी मांगली येथे भेट देऊन हायरिस्क व्यक्तींच्या स्वॅबचे नमूने घेत तपासनीसाठी पाठविले आहेत. सकाळपासूनच तहसील कार्यालय, पोलिस ठाणा व आरोग्य विभाग ऍक्‍शनमध्ये आले होते. त्यांचे सर्व लक्ष मांगलीवर केंद्रित केले आहे.