
मार्चपासून देशात कोरोनाने थैमान घातले. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला पहिल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. १५ एप्रिलपर्यंत घरातून कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले
नागपूर : कोरोनामुळे ‘फिजिकल डिस्टन्सिंग' हा शब्द घराघरांत पोहोचला. घरांमध्ये या शब्दाचा जसाचा तसा अर्थ घेतल्याचे मागील वर्षी व यंदाच्या सोनोग्राफीच्या तुलनात्मक आकडेवारीवरन दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोनोग्राफी चाचणीत ३० ते ५० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.
मार्चपासून देशात कोरोनाने थैमान घातले. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला पहिल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. १५ एप्रिलपर्यंत घरातून कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आणि संपूर्ण देश घरांमध्येच ‘लॉक' झाला. यात नंतर वाढ होत गेली. जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली.
चंद्रपुरातील कार्पेट जाणार सातासमुद्रापार, विदेशात होणार विक्री; मूल, पोंभुर्णात कार्पेट प्रकल्प
दरम्यानच्या काळात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दोन व्यक्तीमधील सुरक्षित अंतरासाठी सोशल डिस्टन्सिंगऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग शब्द वापरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले. कोरोनाचे संक्रमण होणार नाही एवढे अंतर संशयित अन् इतरांमध्ये असावे, असा फिजिकल डिस्टन्सिंगचा अर्थ आहे.
घरात अनेक दिवस कैद राहील्याने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बाळ जन्म घेतील, अशा आशयाचे जोक्स, मिम्स तयार झाले होते. सोशल मिडियावर त्याचा धूमाकूळ होता. परंतु वास्तविकता वेगळी असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेली सोनोग्राफी चाचणी व यंदा करण्यात आलेल्या सोनोग्राफी चाचणीची आकडेवारी बघता घरांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग'चा जसाचा तसा अर्थ घेतल्याचे दिसून येत आहे.
यंदा २०२० मध्ये जानेवारी, फेब्रुवारी व जून महिन्यांचा अपवाद वगळता मागील वर्षीच्या तुलनेत इतर महिन्यांत गरोदरपणात सोनोग्राफी करणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच घट झाली आहे. यंदा मार्च, एप्रिल, मेमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी सोनोग्राफी चाचणीत घट झाली. जूनमध्ये लॉकडाऊन मागे घेताच मागील वर्षी जूनच्या तुलनेत सोनोग्राफी करणाऱ्यांची संख्या ३९८ ने वाढली. जुलै ते ऑक्टोबरपर्यंत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत सोनोग्राफी करणाऱ्यांत घट झाली.
काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण
गर्भधारणा व्यवस्थित झाली की नाही, बाळाची वाढ कशी होत आहे? याची अचूक उत्तरे सोनोग्राफी चाचणीतून मिळतात. एकापेक्षा जास्त गर्भ असण्याची शक्यता पडताळून पाहता येते, त्यानुसार गरोदरपणात काळजी घेणे शक्य होते. त्यामुळे पहिली सोनोग्राफी चाचणी आवश्यक असते व ती गर्भ राहिल्यानंतर आठ आठववड्यात केली जाते.
संपादन - अथर्व महांकाळ