esakal | काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण
sakal

बोलून बातमी शोधा

No one will be cremated on Sunday in Wardha

मृताच्या परिवाराने किंवा आप्तजनाने पालिका प्रशासनातील जबाबदार कर्मचाऱ्यांकडे किंवा एखाद्या नगरसेवकाकडे रक्षा विसर्जित करण्यासाठी टँकरची मागणी केली तर एकच उत्तर मिळते ‘आज रविवार आहे ना भाऊ, आपला चालक सुट्टीवर आहे.’ यामुळे नातेवाईकांच्या कुटुंबायांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो.

काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

sakal_logo
By
मोहन सुरकार

सिंदी रेल्वे (जि. वर्धा) : ‘मृत्यू काही सांगून येत नाही’ अशी फार प्रचलित मराठीत म्हण आहे. मात्र, सिंदीकरांना पालिका प्रशासनाने अलिखित नियमच घालून दिला की ‘मृत्यू केव्हाही हो; मात्र, अंत्यविधी रविवारी कोणीही करू नये. अन्यथा आपणास विविध अडचनींचा सामना करावा लागेल आणि याला सर्वशी आपणच जबाबदार असाल?’ कारण, रविवारी पालिका प्रशासन सुट्टीवर असते.

सविस्तर वृत असे की, दहा महिण्यांपासून जग कोरोनासारख्या महामारी आजाराशी लढत आहे. यादरम्यान अनेकांनी वेळेआधीच या जगाचा निरोप घेतला. अनेकांचे वेळीअवेळी निधन झाले. कोरोनाने मरण पावलेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे सौभाग्यसुध्दा त्यांच्या आप्तपरिवाराला लाभू शकले नाही.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

मात्र, सिंदी शहरात शनिवारी किंवा रविवारी निधन झालेल्या सिंदीकरांच्या पार्थिवावर कोणीही रविवारी अंतवीधी करू नये. असा अलिखित नियमच पालिका प्रशासनाने घालून दिला आहे.

शहरातील पळसगाव रस्त्यालगतच्या स्मशानभूमीला लागूनच नंदा नदी वाहते. मात्र, नदी बारमाही वाहणारी नसल्याने येथे सतगत झाल्यानंतरची रक्षा विसर्जनाची मोठी अडचण जाते. यासाठी उपायोजना म्हणून पालिका योग्य मोबदल्यात येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करते.

मात्र, पालिकेच्या पांढरा हत्ती असलेल्या अग्निशमन केंद्रातील अग्निशमन गाडीचा चालक जो अग्निशमनची गाडी कमी आणि पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या, पाणी टँकर पुरवठा करणाऱ्या टॅक्टर जास्त चालवतो, असा एकमेव चालक नागपूर येथून अपडाऊन करतो.

सविस्तर वाचा - व्हॉट्‌सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या

तो शासकीय सुट्टीमुळे रविवारी शहरातच नसतो. रविवारी सरकारी सुट्टीचा दिवस असल्याने पालिका कार्यालयच बंद असते. रविवारी शहरात कोणाचाही मृत्यू झाला आणि त्यांची अंत्यविधी रविवारीच केली तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

मृताच्या परिवाराने किंवा आप्तजनाने पालिका प्रशासनातील जबाबदार कर्मचाऱ्यांकडे किंवा एखाद्या नगरसेवकाकडे रक्षा विसर्जित करण्यासाठी टँकरची मागणी केली तर एकच उत्तर मिळते ‘आज रविवार आहे ना भाऊ, आपला चालक सुट्टीवर आहे.’ यामुळे नातेवाईकांच्या कुटुंबायांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो.

कर भरण्याचा काय उपयोग?
मृत्यू सारख्या दुःखाच्या वेळी सुध्दा आपले कर्तव्य बजावण्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांचे कर्मचारी कमी पडत असतील तर आम्ही नगर पालिकेच्या शहरात राहून शहराचा कर भरण्याचा काय उपयोग?
- रूपेश दत्ताजी महाजन,
काटोले परिवार, सिंदी रेल्वे

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

महाजन साहेबांकडे अधिक विचारणा करा
ड्रायव्हरला रविवारी सुट्टी आहे. कामावर नसतो म्हणून अडचण येते. तुम्ही महाजन साहेबांकडे अधिक विचारणा करा.
- सुभाष कावटेकर,
अत्यावश्यक पाणीपुरवठा विभाग, नगर पालिका, सिंदी रेल्वे

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top