शिवभक्तांनो, पचमढी यात्रेला जाताय? जाणून घ्या बसचे वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पचमढी यात्रेकरिता बुधवार (ता. 12) पासून दररोज 19 फेऱ्या सोडण्यात येत आहेत. सोबतच परतणाऱ्या प्रवाशांसाठीही पचमढी येथून 19 फेऱ्या सोडण्यात येत आहेत. गणेशपेठेतील मध्यवर्ती बसस्थानक येथून दुपारी चार ते रात्री अकरादरम्यान प्रत्येक अर्धा तासाने बसेस सोडण्यात येत आहेत.

नागपूर : महाशिवरात्रीच्या पर्वावर मध्य प्रदेशातील पचमढी येथे भव्य यात्रा भरते. यात्रेसाठी नागपूर व विदर्भातील भाविक मोठ्या संख्येने जातात. भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. अतिरिक्त सुविधेमुळे शिवभक्तांना मोठा दिलासा मिळत आहे.

पचमढी यात्रेकरिता बुधवार (ता. 12) पासून दररोज 19 फेऱ्या सोडण्यात येत आहेत. सोबतच परतणाऱ्या प्रवाशांसाठीही पचमढी येथून 19 फेऱ्या सोडण्यात येत आहेत. गणेशपेठेतील मध्यवर्ती बसस्थानक येथून दुपारी चार ते रात्री अकरादरम्यान प्रत्येक अर्धा तासाने बसेस सोडण्यात येत आहेत. दुपारी 4, 4.30, सायंकाळी 5.00, 5.30, 6.00, 6.15, 6.30, 7.00, 7.15, 7.30, रात्री 8.00, 8.15, 8.30, 9.00, 9.30, 9.45, 10.00, 10.30, 11.00 वाजता बसेस रवाना होतील.

महिला डॉक्‍टरांवर माथेफिरूने फेकले ऍसिड

तसेच पचमढी येथून नागपूरसाठी दुपारी 3.00, 3.15, 3.30, 4.00, 4.30, सायंकाळी 5.00, 5.30, 6.00, 6.30, 7.00, 7.30, 7.45, रात्री 8.00, 8.30, 9.00, 9.15, 9.30, 10.00, 10.30 वाजता बसेस सोडण्यात येतील. तिकिटाचे आरक्षण तसेच अन्य माहितीसाठी भाविकांना गणेशपेठ बसस्थानक येथे संपर्क साधता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special st bus service for pachamadi from nagpur