थकीत वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे ‘आत्मक्लेष'

योगेश बरवड
Saturday, 10 October 2020

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या आवाहनानुसार आज राज्यभरात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयांपुढे आत्मक्लेष उपोषण करण्यात आले. उपराजधानीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच जणांनाच आंदोलनाची परवानगी देण्यात आली.

नागपूर : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे आज राज्य भरात आत्मक्लेश उपोषण करीत शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. नागपुरातही विभागीय कार्यालयासमोर उपोषण करीत तातडीने थकित वेतन देण्याची मागणी करण्यात आली. 

शासकीय अनास्थेमुळे एसटीचे चाक तोट्याच्या गर्तेत अडकले आहे. वेतनासाठीही पैसे नसल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन रखडले होते. कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेताच शासनाने नमते घेत केवळ महिन्याचे वेतन अदा केले. निव्वळ कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमध्ये उमटली आहे.

जाणून घ्या - सकाळ इम्पॅक्ट! तब्बल २२ किमी पायपीट करणाऱ्या सुनीलला सायकल भेट; मदतीसाठी सरसावले अनेक हात
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या आवाहनानुसार आज राज्यभरात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयांपुढे आत्मक्लेष उपोषण करण्यात आले. उपराजधानीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच जणांनाच आंदोलनाची परवानगी देण्यात आली. उर्वरित कर्मचाऱ्यांनी एक दिवस उपाशी राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. एसटी कर्मचाऱ्यांना आधीच तुटपुंजे वेतन मिळते. तेही नियमित नसल्याने घरचे अर्थकारण कोलमडले आहे.

यानंतरही सर्वप्रकारच्या जोखीम स्वीकारून कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात सेवा दिली. यानंतरही वेतन रोखून धरणे अन्यायकारक असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय सचिव पुरषोत्तम इंगोले, विभागीय अध्यक्ष प्रशांत बोकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - कोरोनाच जबाबदार! केस कापण्याच्या किंमतीत झाली तब्बल दुप्पट वाढ; दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर

अशा आहेत मागण्या 

  • एसटी महामंडळ शासनात विलीन करावे 

  • दोन महिन्याचे थकित वेतन तत्काळ द्यावे 

  • कोरोना काळातील विशेष भत्ता नियमानुसार द्यावा 

  • कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने द्यावी 

  • लॉकडाउन काळात हजेरी देताना झालेला भेदभाव दूर करावा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST employees in action mode