दीनदयाल थालीच्या जागी शिवभोजन थाली सुरू करा; मेडिकल आणि मेयोतील रुग्णांची सरकारला हाक

केवल जीवनतारे 
Wednesday, 16 December 2020

बीपीएल गटात मोडणाऱ्या गरीबांच्या आजारावर वरदान ठरलेल्या मेयो मेडिकलमध्ये २०१७ मध्ये दीनदयाल थाली सुरू करण्यात आली. अलिकडे कोरोना काळात दीन दयाल थाली बंद असल्याने आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील रुग्णांचे हाल होत आहेत.

नागपूर ः मेडिकलमध्ये भरती रुग्णांच्या नातेवाइकांच्या भुकेची सोय व्हावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रग्णालयात परिसरात दीनदयाल थाली सुरू करण्यात आली. मात्र कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात दीनदयाल थाली बंद आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी यासाठी दीनदयाल थालीच्या जागी शिवभोजन थाली सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज

बीपीएल गटात मोडणाऱ्या गरीबांच्या आजारावर वरदान ठरलेल्या मेयो मेडिकलमध्ये २०१७ मध्ये दीनदयाल थाली सुरू करण्यात आली. अलिकडे कोरोना काळात दीन दयाल थाली बंद असल्याने आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष असे की, अलिकडे सामान्य आजारापासून तर कॅन्सरसह इतर दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचाराला मेयो, मेडिकलमध्ये आल्यानंतर येथे महिनोमहिने रुग्णांच्या नातेवाईकांचा मुक्काम असतो. 

खिशात पैसे नसल्याने त्यांना ही थाळी जगण्यासाठी आधार असते. मात्र दीनदयाल थाली बंद असल्याने येथे शिवभोजन थाली सुरू करावी अशी मागणी विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

क्लिक करा -सालेकसातील शेतात आढळला मांजरीसारखा दिसणारा प्राणी; जवळ जाऊन बघितले असता अंगाचा उडाला थरकाप

मेडिकलमध्ये उपचाराला येणारे रुग्ण विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा सारख्या शेजारील राज्यांमधील असतात. सर्व रुग्ण गरीब असतात. दोन वेळच्या जेवणाची सोय नसते. नातेवाईकांच्या जेवणासाठी हाल होऊ नये म्हणून ती सोय करण्यात आली होती. परंतु कोरोना काळात मेडिकल आणि मेयोत दिनदयाल थाली उपक्रम सुरू केला होता. मात्र अलिकडे ही थाळी बंद आहे. यामुळे मेडिकल परिसरात नेत्र विभाग तर मेयोत सर्जिकल कॉँम्प्लेक्स जवळ दिलेल्या जागेवर शिवभोजन थाली सुरू करावी.
-त्रिशरण सहारे, 
अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start Shivbhojan thali instead of Dindayal thali seek medical mayo people