राज्य आपत्ती पथकाचा लागला कस, तब्बल १४ तासांनी लागला मृतदेह हाती...

विजयकुमार राऊत
Tuesday, 22 September 2020

रविवारी सकाळी सहा वाजतापासून SDRF पथकाने हर्षदचा मृत्यूदेह शोधकार्य करताना योग्य अंदाज घेऊन विविध पद्धत वापरून  नदी डोहात अडकलेला मृत्यूदेह काढण्याकरिता बरेच परिश्रम घेतले. दुपारी साडेबारा वाजता हर्षदचा मृत्यूदेह डोहातून काढण्यात यश आले. तिन्ही मृतदेह पोलिस ठाणे खापरखेडा यांना सोपविण्यात आले.

नागपूर ग्रामीणः  वार रविवार, वेळ सकाळी सहाची. घटना कोलार नदीत अस्थिविसर्जनास आलेले तिघे मित्र नदीत पोहताना बुडाल्याची. नदीपात्रात तिघांचेही मृतदेह शोधताना राज्य आपत्ती पथकाचा अक्षरशः कस लागला. परंतू पथकाच्या ‘जॉंबाज’ कर्मचाऱ्यांना चोवीस तासात अनेक अशचणींना सामोरे जावे लागले. नेहमीप्रमाणे अथक परिश्रम घेऊन अखेर तिसराही मृतदेह शोधून काढला.

अधिक वाचा: डिसेंबर अखेरपर्यंत राहणार बोर अभयारण्याचे प्रवेशद्वार लाॉकडाउनच...
 

अशी घडली घटना
दहेगाव रंगारी, कोलार घाट कोलार नदी येथे शनिवारी दुपारी२ वाजती मित्राच्या आजीचे अस्थिविसर्जन करण्याकरिता नातेवाईक, मित्रपरिवार व कुटुंबीय बिनसंगम येथे घाट बंद असल्याने किल्ले कोलार घाटावर आले. अस्थिविसर्जन कार्यक्रमात सहभागी झालेल्यांत महिला व वयस्कांपेक्षा युवकाचे प्रमाण अधिक होते. अस्थिविसर्जन कार्यक्रम आटोपला आणि काही मित्रांना अंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. घाटावरील कोलार नदी पात्रात मोठा डोह आहे. अशा जीवघेणा डोह नदी पात्रात शंiतनू  उर्फ  नयन कैलास येडेकर (वय२०, नवीन बाबुळखेडा, नागपूर) हा अंघोळीसाठी मित्रासह गेला. त्याने पाण्यात उडी मारली व तो बुडायला लागताच दुसरा मित्र आकाश राजेंद्र राऊत (वय२५, रामेश्वरी नागपूर) याने मित्र बुडाल्याचे दिसताच पाण्यात उडी मारली, मात्र तोसुद्धा बुडाला. त्याला वाचविण्याकरिता पुन्हा तिसरा मित्र हर्षित राजू येदवाण(वय२०, लाकडीपूल, नागपूर) यानेही पाण्यात उडी मारली. तोही बुडाला. मित्रपरिवाराने पोलिस ठाणे खापरखेडा यांना घटनेची माहिती दिली.

अधिक वाचाः बाधितांच्या संख्येपुढे दम टाकताहेत जिल्ह्यातील कोविड रुग्णालये, उपचारांच्या ‘ऑक्सिजनची गरज
 

राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाची कामगिरी
पोलिस ठाण्याच्या सहकाऱ्यांनी घटना ठिकाण गाठून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नागपूर यांना राज्य आपत्ती प्रतिसाद दल(SDRF)नागपूर मागणी करताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल त्वरित कमांडंट जावेद अन्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अजय काळसर्पेंसोबत२० रेस्क्युअर,  शोध साहित्यासह घटनास्तळी त्वरित दाखल होऊन शोध कार्यवाहि सुरु केली. रात्री उशिरापर्यंत आकाश व शंतनू या दोघांचे मृत्यूदेह काढण्यात यश आले. रविवारी सकाळी सहा वाजतापासून SDRF पथकाने हर्षदचा मृत्यूदेह शोधकार्य करताना योग्य अंदाज घेऊन विविध पद्धत वापरून  नदी डोहात अडकलेला मृत्यूदेह काढण्याकरिता बरेच परिश्रम घेतले. दुपारी साडेबारा वाजता हर्षदचा मृत्यूदेह डोहातून काढण्यात यश आले. तिन्ही मृतदेह पोलिस ठाणे खापरखेडा यांना सोपविण्यात आले. त्यांनी मृतदेह मेयो रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता हलविले.

युवकांनो,भान ठेवा !
कोलार नदीपात्रात काही खड्डयांच्या ठिकाणी पाणी जास्त असल्याचा अंदाज पोहणाऱ्यांना येत नाही. त्यामुळे पोहणारी व्यक्ती त्या खड्डयात अडकते आणि तिथेच त्याचा घात होतो. कोलार नदीपात्र पोहण्यासाठी मुळीच नाही. तिथे फक्त अस्थिविसर्जन केले जाते, याचे भान ठेऊनच यावे. या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आल्यास असे प्रकार टाळता येतील.
प्रमोद लोखंडे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक(एसडीआरएफ)
 

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The State Disaster Squad started working, after 14 hours, the bodies were found.