esakal | टिनाच्या शेडात पाच मुली, माय आणि आजी, चार महिन्यांपासून नाही अंघोळ 
sakal

बोलून बातमी शोधा

story about woman and her children in nagpur jaitala area

जयताळा भागातील एकात्मतानगर झोपडपट्टीत बहुतांश श्रमिकांची घरे आहेत. याच वस्तीत कौशल्याबाई खंडारे त्यांची मुलगी लक्ष्मी यांच्यासह राहतात. नाव कौशल्या आणि लक्ष्मी असले तरी त्यांच्या घरी पदोपदी अठराविश्वे दारिद्रयच.

टिनाच्या शेडात पाच मुली, माय आणि आजी, चार महिन्यांपासून नाही अंघोळ 

sakal_logo
By
अतुल मांगे

नागपूर  ः एक पाल आनं क पलंग एवढच आमच्याकडं होतं. उन्हाळा-हिवाळा कसातरी जाये. बारिश आली का आमी पलंगाखाली जावो. माय वरून पाल झाके. सचिनमामानं टिनाचं घर बांधलं. पन आंग धुवाले आमाले जागाच नायी. कौशल्याबाई सांगत होत्या.

जयताळा भागातील एकात्मतानगर झोपडपट्टीत बहुतांश श्रमिकांची घरे आहेत. याच वस्तीत कौशल्याबाई खंडारे त्यांची मुलगी लक्ष्मी यांच्यासह राहतात. नाव कौशल्या आणि लक्ष्मी असले तरी त्यांच्या घरी पदोपदी अठराविश्वे दारिद्रयच. त्यातच लक्ष्मीच्या पोटी एक दोन नव्हे तर तब्बल पाच पोरी. कांचन, रेणुका, मंजिरी, दिया व चिकू अशी त्यांची नावे. सर्वात मोठीचे वय १३ तर सर्वात लहान चार वर्षांची. उर्वरित तीन त्यांच्या मधल्या. 

शासकीय खर्चातून कारागृह प्रशासनाला मोबाईल मंजूर 

लक्ष्मीचा नवरा पाचही मुलींना जन्माला घालून परागंदा झालेला. महिने-दोन महिन्यातून कधीतरी तो उगवतो. चार-दोन दिवस राहतो. मग मायले मारझोड करून पुन्हा पळतो. पालाखाली राहत असलेल्या या कुटुंबाकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नव्हता. परंतु याच भागातील सामाजिक कार्यकर्ते सचिन लोणकर यांनी कौशल्याबाई आणि त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याचे ठरवले अन् २५ हजार रुपये उभे करून त्यांना टिनाचे शेड उभारून दिले. 

या वेदनांना अंत नाही

लक्ष्मी चार घरी भांडी-धुण्याचे काम करते. तर कौशल्याबाई घरी मुलींचा सांभाळ करतात. आर्थिक ओढाताण सहन करता करता करता कौशल्याबाई पुरत्या थकून गेल्या आहेत. टिनाचे घर तर झाले, परंतु शौचालय, आंघोळीसाठी कुठलीही सोय नसल्याने मुलींसह त्यांना कित्येक दिवस आंघोळीविना रहावे लागते. त्यामुळे कौशल्याबाईंच्या शरीराला खाज सुटली आहे. मुलींचीही गत याहून निराळी नाही. घरात लाईट नसल्याने काल लहानी दिव्याने पेटता पेटता वाचली. दिव्याले रोज पाव-अर्धा पाव तेल लागते. खालेच नाही तर दिवा कुठून लावू, अशा कर्मकहाणी कौशल्याबाई डोळे पुसत सांगत होत्या. त्यांच्या या वेदना गप्पगार करणाऱ्या अशाच होत्या. त्या म्हणाल्या, पोरीयची उमर वाढत चाल्ली. लय भेव वाट्टे. ईटा-मातीचं घर बांधाले पैसे नायी. जीव लय पिसायल्यासारखा झाला. कव्हा काय व्हईन कोन जाने.