esakal | मोबाईल ठरतोय कैद्यांसाठी देवदूत: नातेवाईकांशी बोलण्यासाठी कारागृहाकडून व्हिडिओ कॉलिंगची सुविधा 
sakal

बोलून बातमी शोधा

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612874219420,"A":[{"A?":"I","A":74,"B":780.07611299999,"D":145.92388700001,"C":46.130352678872526,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B":{"A":-7.105427357

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. तब्बल 10 महिने सर्व वाहतूक ठप्प होती. याचा फटका कारागृहातील बंदिवानांनाही बसला

मोबाईल ठरतोय कैद्यांसाठी देवदूत: नातेवाईकांशी बोलण्यासाठी कारागृहाकडून व्हिडिओ कॉलिंगची सुविधा 

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा : कोरोनाकाळत असलेल्या बंदमुळे बंदिवानांना त्यांच्या नोवाईकांना भेटता आले नाही. हीच स्थिती सध्या आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाच्या वतीने कारागृहांना मोबाईलची सुविधा दिली. हा मोबाईल या बंदिवानांसाठी देवदूतच ठरला. मोबाईलमध्ये असलेल्या व्हिडिओ कॉलिंगमुळे या बंदिवानांना त्यांच्या नातलगांनी संवाद साधत त्यांना बघताही आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. तब्बल 10 महिने सर्व वाहतूक ठप्प होती. याचा फटका कारागृहातील बंदिवानांनाही बसला. कैद्यांना नातेवाइकांना भेटण्यास रोख लावण्यात आली. मात्र, शासनाने शासकीय खर्चातून कारागृह प्रशासनाला मोबाईल मंजूर केला आहे. त्या मोबाईलवरून कारागृहातील बंदिवान आपल्या
नातेवाइकांशी संवाद साधतात. एखाद्या बंदिवानाने नातेवाइकांशी भेटण्याची इच्छा दर्शविली असता त्याला व्हिडिओ कॉलिंगद्वारे नातेवाइकांना पाहण्याची संधी दिली जात आहे. एकंदरीत, कोरोनाकाळातही बंदिवानांना कारागृह प्रशासनाकडून मोठा आधार मिळत आहे.

हेही वाचा - ...अन् ५० कोटी मिळवा, अजित पवारांची खुली ऑफर

कोरोनामुळे बंदिवानांच्या नातेवाइकांची भेटगाठ बंद करण्यात याव्या, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. मात्र, त्याला पर्याय म्हणून शासनाने शासकीय खर्चातून मोबाईल दिला. त्या मोबाईलद्वारे ऑनलाइन तसेच व्हिडिओ कॉलिंगद्वारे बंदिवानांना त्यांच्या नातलगांसोबत संवाद साधण्याची शासनाने सवलत दिली. 

ज्या बंदीला आपल्या नातेवाइकांशी बोलायचे आहे, त्या बंदीचे वकील ऑनलाइन अर्ज करून नातेवाइकांशी संवाद साधण्याची परवानगी घेत आहेत. एकंदरीत वर्धा जिल्हा कारागृह देखील बंदिवानांची चांगली देखभाल करीत असून त्यांना लागणाऱ्या आवश्‍यक सुविधा पुरवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन आणि कारागृहप्रशासनाने बंदिवानांना दिलासा दिला आहे.

हेही वाचा - ‘व्हॅलेंटाईन विक’ने घातला घोळ अन् दोन कुटुंबांमध्ये...

वर्धा कारागृहात 290 बंदी

जिल्हा कारागृहात 290 बंदी आहेत. त्यापैकी ज्याने नातलगांशी संवाद साधण्याची इच्छा दर्शविली त्याला या मोबाईलच्या माध्यमातून नातलगांशी संवाद साधण्याची मुभा देण्यात येत असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही सुविधा नवे आदेश येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top