नागपूर विद्यापीठात परीक्षेआधीच नियोजनाचा गोंधळ, परीक्षा अ‌ॅपमुळे विद्यार्थी संभ्रमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students are confused due to exam app of rtm nagpur university

२४ सप्टेंबरपासून विद्यापीठाची उजळणी परीक्षाही सुरू होणार होती. विद्यापीठाद्वारे पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार असल्याने उजळणी परीक्षा महत्त्वाची होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे गुरुवारी हे अ‍ॅप उपलब्ध होऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले.

नागपूर विद्यापीठात परीक्षेआधीच नियोजनाचा गोंधळ, परीक्षा अ‌ॅपमुळे विद्यार्थी संभ्रमात

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन सुरू केले. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर त्यातील गोंधळ समोर येऊ लागले आहेत. विद्यापीठाने बुधवारी परीक्षा अ‍ॅपचे विमोचन केले असले तरी अ‍ॅपमध्ये विषयनिहाय प्रश्नपत्रिका नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उजळणी परीक्षा(मॉक टेस्ट)देता आली नाही. अद्यापही परीक्षा अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले असून विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

हेही वाचा -तुकाराम मुंढे जाताच अधिकाऱ्यांवरच धाक संपला;...

विद्यापीठाने बहूपर्यायी ऑनलाईन परीक्षेसाठी आरटीएमएनयू परीक्षा अ‍ॅप तयार केले आहे. सर्व प्रकारची तपासणी आणि सुरक्षेच्या हमीसह २४ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना हे अ‍ॅप वापरता येणार होते. याशिवाय २४ सप्टेंबरपासून विद्यापीठाची उजळणी परीक्षाही सुरू होणार होती. विद्यापीठाद्वारे पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार असल्याने उजळणी परीक्षा महत्त्वाची होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे गुरुवारी हे अ‍ॅप उपलब्ध होऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले.

हेही वाचा - यंदा निळ्या पाखरांनी गजबजणार नाही दीक्षाभूमी; सर्व कार्यक्रम रद्द, ५७ वर्षांत प्रथमच...

अद्यापही विद्यापीठाचे अ‍ॅप गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे विद्यापीठाने लिंक पाठवून आरटीएमएनयू परीक्षा अ‍ॅप विद्यार्थ्यांना डाऊनलोड करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर विद्यार्थ्यांनी उजळणी परीक्षा देण्याचा प्रयत्न केला असता विषयनिहाय प्रश्न उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले. उजळणी परीक्षा ही त्यांच्या विषयाची होणे अपेक्षित आहे. मात्र, अ‍ॅपमध्ये तशी सुविधाच नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. याविरोधात विद्यार्थ्यांनी प्राधिकरण सदस्य आणि विद्यार्थी संघटनांकडेही तक्रार केली आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीका होत असून परीक्षेआधीच विद्यापीठाचा गोंधळ समोर आला आहे.
 

loading image
go to top