Video : ‘शाळा बंद, पण अभ्यास सुरू’; ऑनलाईन अभ्यासासोबतच बच्चेकंपनी गायन-वादनात दंग

Students stumbleupon singing and playing along with online studies
Students stumbleupon singing and playing along with online studies

गुमगाव (जि. नागपूर) : हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील चिमुकले ऑनलाईन, ऑफलाईन अभ्यास आटोपल्यानंतर गावातील मंदिरात एकत्र येऊन दररोज सायंकाळी टाळ, घंटा, नगारा आणि टाळ्यांच्या तालावर प्रार्थना, पसायदान, आरती, हनुमान चालिसाचे तालासुरात गायन-वादन करीत भक्तीच्या सागरात रंगलेले दिसून येत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन, अनलॉक, क्वारंटाईन, कंटेनमेंट झोन असे शब्द बच्चेकंपनीच्या कानावर येत आहेत. ‘शाळा बंद, पण अभ्यास सुरू’ ही संकल्पना सर्वत्र राबविली जात आहे. त्यातून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग म्हणून बच्चेकंपनी चित्रकला, रांगोळीत पारंगत होत आहे. तर काही चिमुकले पतंगबाजीचा आनंद लुटत आहेत.

मोबाईल, इंटरनेट यासारख्या गोष्टींना कंटाळलेली बच्चेकंपनी सध्या नित्यनेमाने सायंकाळी गावातील हनुमान मंदिरात एकत्र येतात. मंदिर आणि मंदिराच्या परिसराची स्वच्छता करून एकमेकांसोबत अभ्यासासोबतच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा केल्यानंतर टाळ, नगारा, घंटा यांसारख्या उपलब्ध सांगीतिक साहित्यावर ताल धरून गायन, वादन करण्यात मग्न होत आहेत.

मोबाईल, इंटरनेटच्या युगात जिथे बच्चेकंपनी घरातल्या घरात कोंडून असते, अशावेळी गावातील सानिकेत बोरकर, वेदांत उपासे, वंश सावरकर, देवांशू बोरकर, रेवंत बोरकर, वेदांत नरड, नक्ष चरडे, आयुष सावरकर, सारांश आंबटकर यासारख्या चिमुकल्यांनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. कोरोना विषाणूच्या संकटकाळात चिमुकल्यांनी मंदिरात तसेच परिसरामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सुरू केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सध्या कौतुक होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com