परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक; व्हॉट्सॲपवर दिली आत्महत्येची धमकी, वाचा नेमका वाद कशावरून?

Students threatened to kill themselves if they did not take the exam online
Students threatened to kill themselves if they did not take the exam online
Updated on

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बॅकलॉग’ विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक काहीच दिवसांत घोषित करण्यात येणार आहे. या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये घेण्यात येणार आहे. मात्र, यापैकी शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना एसएमएस आणि व्हॉट्सॲप मॅसेज टाकून ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. ती न झाल्यास थेट आत्महत्येची धमकी दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकाराने प्रशासनात खळबळ माजली आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, निकालही देण्यात आले आहेत. आता विद्यापीठाद्वारे बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबतीत विद्यापीठाच्या विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने बॅकलॉगच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा तीन प्रकारात घेण्याचे ठरविले. त्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन आणि मिक्स मोडचा समावेश होता.

मात्र, या परीक्षा केवळ ऑनलाईन घेण्यात यावा, यासाठी काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारून ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयावर प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी आक्षेप घेत केवळ ऑनलाईन परीक्षा घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे प्रशासन ऑफलाईन परीक्षा घेण्याचा तयारीत आहे.

मात्र, या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आता शंभराहून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना एसएमएस, व्हॉट्सॲप मेसेज टाकून ऑफलाईन परीक्षा घेतल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.

तीस हजारांवर विद्यार्थी अडकले

विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षेत तीस हजारांवर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत विद्यार्थ्यांचे गुण बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे आता बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत मागणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे अद्याप विद्यापीठाने अधिकृतरित्या परीक्षेची घोषणा केलेली नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com