काच फोडली, नस कापली, अन्‌ पुढे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

पोलिसांची कारवाई सुरू असतानाच जुबेरने स्वागत कक्षाच्या खिडकीवर बुक्की मारून काच फोडले. त्या काचने कापले मनगट कापले. तत्काळ पोलिस त्याला उपचारार्थ रुग्णालयात घेऊन गेले.

नागपूर : कपिलनगर पोलिस ठाण्यात एका आरोपीने खिडकीचा काच फोडून हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. आत्महत्येचा प्रयत्न करणारा आरोपी वनदेवीनगर झोपडपट्टी निवासी जुबैर अब्दुल करीम कुरेशी (22) आहे. जुबेरवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची चर्चा आहे.

दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; दोन युवकांचा मृत्यू

सोमवारी मध्यरात्री कपिलनगर पोलिस परिसरात गस्त घालत होते. दरम्यान जुबेर आणि त्याचा साथीदार लष्करीबाग निवासी रोहन शंकर बिहारे (19) संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ हत्तीमार चाकू आढळला. दोघांनाही पोलिस ठाण्यात आणण्यात आले. जुबेरचा भाऊ ही ठाण्यात आला.

पोलिसांची कारवाई सुरू असतानाच जुबेरने स्वागत कक्षाच्या खिडकीवर बुक्की मारून काच फोडले. त्या काचने कापले मनगट कापले. तत्काळ पोलिस त्याला उपचारार्थ रुग्णालयात घेऊन गेले. उपचारानंतर त्याला सुटी मिळाली. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा गुन्हा नोंदविला आहे.

तसेच रोहन आणि त्याच्यावर आर्म्स ऍक्‍टअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचीही मैत्री कारागृहात झाली होती. दोघेही मध्यरात्रीला लुटमार करण्याच्या तयारीत होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने ही घटना घडली. या घटनेवरून पोलिसांचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide attempt at police station