तिघींची पावले झपाझप पुढे-पुढे पडत होती; युवतीच्या डोळ्यांदेखत आई-बहिणीची आत्महत्या

योगेश बरवड
Friday, 16 October 2020

गुरुवारीसुद्धा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर राजू हे दुपारी कामावर निघून गेले. संताप अनावर झाल्याने तिन्ही मायलेकी घरून पायीच निघाल्या. काय करावे, कुठे जावे याची कोणतीही स्पष्टता नव्हती. पण, पावले झपाझप पुढे-पुढे पडत होती. आंबाझरी तलावाजवळ आल्यानंतर पावले थांबाली. तोवर चिर्र आंधार झाला होता.

नागपूर : युवतीच्या डोळ्यादेखतच आई व बहिणीने अंबाझरी तलावात उडी घेत जीवन संपवीले. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही दुर्दैवी घटना घडली. कौटुंबिक कलहातून दोघींनी टोकाचे पाऊन उचलल्याची माहिती पुढे येत आहे. सविता राजू खंगार (४५) असे आईचे तर रुचिता राजू खंगार (२०) असे मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंगार कुटुंब विद्यनगर, वाठोडा ले-आऊट येथील रहिवासी आहे. सविता यांना दोन मुली असून रुचिता ही धाकटी होती. पती राजू हे संगणक ऑपरेटर म्हणून कामाला आहेत. थोरली मुलगी श्वेतल (२२) ही या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. राजू यांचे भावासोबत वाद सुरू आहे. त्यातून रोजच खटके उडायचे. दररोज होणाऱ्या वादाला सवितासह त्यांच्या मुलीही कंटाळल्या होत्या.

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

गुरुवारीसुद्धा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर राजू हे दुपारी कामावर निघून गेले. संताप अनावर झाल्याने तिन्ही मायलेकी घरून पायीच निघाल्या. काय करावे, कुठे जावे याची कोणतीही स्पष्टता नव्हती. पण, पावले झपाझप पुढे-पुढे पडत होती. आंबाझरी तलावाजवळ आल्यानंतर पावले थांबाली. तोवर चिर्र आंधार झाला होता. काहीवेळ तिघींनीही रोजच्या भांडणावर त्रागा व्यक्त केला. यानंतर आई आणि बहिणीने एका पाठोपाठ पाण्यात उडी घेतली.

श्वेतलने केला समजूत काढण्याचा प्रयत्न

रोजचीच कटकट असल्याने जगून उपयोग नाही. सामूहिक आत्महत्या हाच पर्याय आहे. त्यातूनच चिर शांतता लाभेल यावर सविता आणि रुचिता ठाम होत्या. श्वेतलने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हातपाय जोडून त्यांचे मन वळिवण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला. परंतु, दोघीही एकूण घेण्याच्या स्थितीत नव्हता. श्वेतलचे प्रयत्न सुरू असतानाच रात्री १२.३० च्या सुमारास आई आणि बहिणीने एका पाठोपाठ पाण्यात उडी घेतली.

पोलिस दिसताच फोडला हंबरडा

काहीच सुचेनासे झालेल्या श्वेतलने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच अंबाझरी ठाण्याचे पोलिस घटनास्थाळी दाखल झाले. आई-बहिणीने उचललेल्या पावलामुळे तिचे अवसानच गळाले. कासावीस अवस्थेतीप कसेबसे स्वतःला सांभाळून ठेवले होते. पोलिस दिसताच तिने हंबरडा फोडला. तोंडातून बोलही फुटत नव्हते.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद

तातडीने अग्नीशमन दल व परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बेलावून घेत पाण्यात शोधमोहीम राबविण्यात आली. काही वेळातच दोन्ही मृतदेह मिळाले. तोवर पोलिसांनी धीर देत श्वेतलला बोलते केले. कौटुंबिक कलहानेच आणखी एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त केल्याचे वास्तव तिच्या सांगण्यातून पुढे आले. तूर्त अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of mother and sister in the eyes of a young girl