esakal | (Video) मित्र भेटायला आला, दोघेही निवांत जागेत चर्चा करीत असता अंकिता धावत निघाली... 
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide of woman jumping from fourth Floor

संतापाच्या भरात अंकिता चौथ्या माळ्याच्या वर धावत गेली. सौरभही धावतच तिच्या मागे गेला. अंकिताने कोणतीही संधी न देता चौथ्या माळ्यावरून खाली उडी घेतली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.

(Video) मित्र भेटायला आला, दोघेही निवांत जागेत चर्चा करीत असता अंकिता धावत निघाली... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : युवतीने इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी मानकापूर भागात ही थरारक घटना घडली. मित्रासोबत झालेल्या वादानंतर त्याच्या डोळ्यादेखतच तिने टोकाचे पाऊल उचलले. 

अंकिता कृष्णराव माकोडे (24), रा. जामदारवाडी, मेहंदीबाग असे मृत युवतीचे नाव आहे. ती चारच महिन्यांपूर्वी बीझ प्रॉस्पेक्‍ट्‌स कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून रूजू झाली होती. मानकापूर येथील एलेक्‍सिस हॉस्पिटलच्या मागील भागात असणाऱ्या राज पॅलेसमध्ये कंपनीचे कार्यालय आहे. तिचे वडील कृष्णराव माकोडे पिठाची गिरणी चालवितात. घराजवळच राहणारा सौरभ वसुले (25) आणि अंकिता सात वर्षांपासून मित्र होते. 

बहिणीच्या प्रेमविवाहाला भावाचाच विरोध अन्‌ दारूच्या नशेत केले हे कृत्य...


सोमवारी दुपारी सौरभ अंकिताला भेटण्यासाठी तिच्या कार्यालयात गेला होता. दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर इमारतीतच फारसे कुणाचे येणे-जाणे नसलेल्या भागात जाऊन दोघेही पुन्हा चर्चा करू लागले. कोणत्यातरी विषयावरून त्यांच्यात वाद झाला. संतापाच्या भरात अंकिता चौथ्या माळ्याच्या वर धावत गेली. सौरभही धावतच तिच्या मागे गेला. अंकिताने कोणतीही संधी न देता चौथ्या माळ्यावरून खाली उडी घेतली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे सौरभ हादरून गेला असून तिच्या कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला आहे. दोघांमध्ये झालेल्या वादाचे कारण किंवा आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचा ताफा दाखल झाला. याप्रकरणी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. 
 

go to top