घरपोच धान्य वितरणाच्या नावावर विद्यार्थ्यांना फ्क्त तांदळाचाच पुरवठा; सेंट्रल किचनच्या शाळांना वगळले

नीलेश डोये
Tuesday, 10 November 2020

नागपूर जिल्ह्यात ५२० शाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषण आहाराचे वितरण होते. सेंट्रल किचनला तांदूळ एफसीआयकडून तर डाळ व इतर कडधान्ये कन्झ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरविण्यात येते.

नागपूर : कोरोनामुळे मार्चपासूनच राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे घरपोच वितरण करण्यात येत आहे. परंतु, यामध्ये सेंट्रल किचनअंतर्गत येणाऱ्या शाळांना वगळण्यात आले आहे. जवळपास ८६ हजारांवर विद्यार्थ्यांना केवळ तांदूळ वितरित करण्यात आले आहेत.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. काही शाळांमध्ये खिचडीच्या स्वरूपात मध्यान्ह भोजन शिजवले जाते. तर शहरातील काही शाळांमध्ये भोजन पुरविण्याचे कंत्राट सामाजिक संस्था व बचत गटांना दिले आहे. तर काही ठिकाणी सेंट्रल किचनच्या माध्यमातून शाळांना आहाराचे वितरण करण्यात येते.

सविस्तर वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याऐवजी धान्याचेच वितरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून हे वितरण करण्यात येते. नागपूर जिल्ह्यात ५२० शाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषण आहाराचे वितरण होते. सेंट्रल किचनला तांदूळ एफसीआयकडून तर डाळ व इतर कडधान्ये कन्झ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरविण्यात येते.

नागपूर शहरात नऊ, वाडी, कामठी व महादुल्यात प्रत्येकी एक सेंट्रल किचन कार्यरत आहे. या सेंट्रल किचनच्या माध्यमातून ८६ हजारांवर विद्यार्थ्यांना पोषण आहार वितरित होतो. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची परवड आणि कुपोषणाची टक्केवारी वाढेल या भीतीने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना घरपोच धान्य वितरणाचा निर्णय घेतला.

जाणून घ्या - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून

कडधान्याचे वितरणच झाले नाही

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या पोषण आहाराचे धान्यही वितरित करण्यात आले आहे. परंतु, जूनपासून आजवर सेंट्रल किचनअंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना केवळ तांदळाचाच पुरवठा करण्यात आला. त्यांना कडधान्याचे वितरणच झाले नसल्याची माहिती आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supply of rice only to students