बीईओंच्या समर्थनात एकवटले विस्तार अधिकारी; पदाचा अतिरिक्त प्रभार सोडण्याचा इशारा

नीलेश डोये
Sunday, 4 October 2020

सीईओंवर दबाव टाकण्यात येत असून चुकीचे काम करणाऱ्यांच्या समर्थनात संपूर्ण विस्तार अधिकारी एकवटल्याचे चित्र आहे.

नागपूर : विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या बीईओंवर कारवाई न करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांनी बीईओ पदाचा अतिरिक्त प्रभार सोडण्याचा इशारा दिल्याची माहिती आहे. एकप्रकारे त्यांच्याकडून सीईओंवर दबाव टाकण्यात येत असून चुकीचे काम करणाऱ्यांच्या समर्थनात संपूर्ण विस्तार अधिकारी एकवटल्याचे चित्र आहे.

गट शिक्षणाधिकाऱ्यांचीच चूक! , विस्तार अधिकारी, शिक्षकाचे उत्तर सादर

आदर्श पुरस्कारासाठी शिक्षकाची निवड करताना गैरव्यवहार प्रकरणात सर्वांनी आपले उत्तर सादर केली असून विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि शिक्षकाने याकरता बीईओला जबाबदार धरल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे सांगण्यात येते. तभाणे या विस्तार अधिकार असून त्यांच्याकडे बीईओ पदाचा अतिरिक्त प्रभार असल्याची माहिती आहे.

त्यांच्यावर कारवाई होता कामा नये,यासाठी विस्तार अधिकार यांनी बीईओ पदाचा अतिरिक्त प्रभार सोडण्याचा इशारा दिल्याची चर्चा आहे.

प्रभार मिळण्यासाठी लॉबिंग

विस्तार अधिकाऱ्यांनाच बीईओ पद हवे आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील काही पंचायत समितीमध्ये बीईओचा प्रभार सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडे होता. काही विस्तार अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांकडे लॉबिंग करीत ते पद आपल्याकडे घेतले. यासाठी तडजोड केल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

बीईओंकडून कामाला फाटा?

शाळांना भेटी देऊन गुणवत्ता तपासणी सोबत पगार बिल काढणे, तक्रार आल्यास चौकशी करण्याचे काम बीईओचे असल्याचे सांगण्यात येते. जि.प.च्या शाळांपेक्षा खाजगी शाळांच्या तपासणीवर त्यांचा भर असल्याचे सूत्रांकडून येते. विस्तार अधिकारी कर्तव्य योग्यपणे बजावत नसल्यानेच गुणवत्ता ढासळत चालत असल्याचे बोलले जाते.
 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In support of ‘those’ BEOs Gathered extension officers