लॉकडाऊनचा रुग्णालयांनाही बसला असा फटका, वाचा काय झाले ते...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

मेडिकलच्या कर्करोग विभागातही किमोथेरपी आणि रेडिएशनद्वारे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ 25 टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. मेडिकलमध्ये पूर्वी 3 हजार तर मेयोत 2 हजार रुग्णांची नोंद बाह्य रुग्ण विभागात होत असे.

नागपूर : कोरोनामुळे सर्वत्र "लॉकडाउन' झाले आहे. यामुळे नियोजित सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या केवळ तातडीचे उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्वी महिनाभरात सुमारे 200 ऍन्जिओग्राफी तर 90 ते 100 ऍन्जिओप्लास्टी होत असते. मात्र, लॉकडाउनमुळे एप्रिल-मे महिन्यात केवळ 30 ऍन्जिओप्लास्टी झाल्या असल्याची माहिती पुढे आली.

मेडिकलच्या कर्करोग विभागातही किमोथेरपी आणि रेडिएशनद्वारे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ 25 टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे. मेडिकलमध्ये पूर्वी 3 हजार तर मेयोत 2 हजार रुग्णांची नोंद बाह्य रुग्ण विभागात होत असे. अलीकडे 500 रुग्णदेखील येत नाही, अशी स्थिती कोरोनामुळे उद्‌भवली आहे. "लॉकडाउन'मुळे विदर्भासह चार राज्यातून येणाऱ्या रुग्णांची कमी झाली. यामुळे बाहेरगावच्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

हृदय विकारापासून तर कॅन्सरग्रस्तांसाठी आवश्‍यक लाईट तसेच डायलिसिसच्या संख्येतही घट झाली आहे. मेडिकलमधील कॅन्सर रोग (रेडिओथेरपी) विभागात दर दिवसाला रेडिएशनसाठी सुमारे 90 पेक्षाही अधिक रुग्णांची नोंद होत असे. परंतु, अलीकडे ही संख्या 25 ते 30 वर आली आहे.

सुपर स्पेशालिटीमध्ये रुग्णसंख्या पंचाहत्तर टक्के रोडावली आहे. काही विभागांमध्ये रुग्णसंख्या खूपच कमी आहे तर, स्त्रीरोगशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, बालरोगशास्त्र आदी विभागांमध्ये रुग्ण नेहमीपेक्षा सत्तर टक्के कमी दिसून येत आहेत. केवळ तातडीच्या उपचारांसाठी रुग्ण येत आहेत. मेडिकलच्या सर्जरी आणि अस्थिव्यंग विभागातही शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले आहे.

दवाखान्यातून घरी परतणाऱ्या डॉक्‍टरवरच केला त्यांनी जीवघेणा हल्ला!

बाहेरगावाहून रेफरही कमी

"लॉकडाउन'पूर्वी विदर्भातून "रेफरल' रुग्णांची संख्या दर दिवसाला दोनशेपेक्षा अधिक होती. मात्र, लॉकडाउन सुरू झाले आणि रेफरल थांबले. मेडिकलमध्ये उपचार घेणारे बहुतांश रुग्ण गोरगरीब असतात. सुटी झाल्यानंतर हे रुग्ण राहणार कुठे, असाही प्रश्‍न आहे. मेडिकलचे जनसंपर्क आधिकारी डॉ. मुरारी सिंग यांनी पोलिसांमार्फत व मदतकर्त्या संस्थांकडून अशा रुग्णांना मदत केली आहे. डॉ. सिंग यांनी पैसे आणि सोबतच एका रुग्णवाहिका चालकाला सोबत दिल्यानेच घरापर्यंत पोहचू शकलो, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The surgeries were postponed in Hospital Due to lockdown