नागपूर शहरात सुरू आहे राहणीमान सर्व्हेक्षण, नागरिकांना सहभागी होण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

शहरात 1 फेब्रुवारीपासून राहणीमान सर्वेक्षण सुरू झाले. 29 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. यात राहण्यास योग्य शहर, महापालिकेचे कामकाज व शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्‍चित करण्यात येणार आहे.

नागपूर : नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने राहणीमान सर्व्हेक्षण सुरू केले असून शहरातही ते सुरू झाले आहे. नागरिकांना यासाठी मत नोंदविण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. देशात 114 शहरांत सर्व्हेक्षण होत असून राज्यातील 12 शहरांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - मेट्रोत प्रवासी संख्येचा आलेख उंचावला, एका दिवसात 17 हजार नागरिकांचा प्रवास
शहरात 1 फेब्रुवारीपासून राहणीमान सर्वेक्षण सुरू झाले. 29 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. यात राहण्यास योग्य शहर, महापालिकेचे कामकाज व शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्‍चित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये देशातील 114 शहरे सहभागी होत असून महाराष्ट्रातील 12 शहरांचा समावेश आहे. नागपूर शहराला त्यामध्ये अव्वल मानांकन प्राप्त व्हावे, याकरीता नागरिकांनी सहभागी होणे आवश्‍यक आहे, असे नागपूर स्मार्ट आणी सस्टेनेबल सिटी डेव्हल्पमेंट कारपोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सांगितले. नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी या सर्व्हेक्षणातून केली जाणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्‍यक आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी यात सहभाग नोंदविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

असे होता येईल सहभागी
सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राहणीमान सर्व्हेक्षणाचा क्‍यूआर कोड स्कॅन करुन या सर्व्हेक्षणामध्ये सहभाग घेता येईल. सर्वप्रथम eol2019. org / citizenfeedback या संकेतस्थळावर जाऊन किंवा क्‍यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रथम महाराष्ट्र राज्य व त्यानंतर नागपूर शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांनी आपले मत नोंदवावे, असे एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी स्पष्ट केले .

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey on standard of living in Nagpur