sakal

बोलून बातमी शोधा

Sushama committed suicide by paying homage to her husband and children

प्रा. धीरज राणे आणि मुले ध्रुव आणि लावण्या या तिघांचा डॉ. सुषमा हिने हायडोज इंजेक्शन टोचून खून केला. या हत्याकांडाचे प्लानिंग डॉ. सुषमा हिने गेल्या आठवड्याभरापासूनच केले होते. त्यानुसार सुषमाने रुग्णालयातून ॲनेस्थेसियाचे इंजेक्शन आणि झोपेच्या गोळ्या घरात आणून ठेवल्या होत्या.

पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : प्राध्यापक पती आणि दोन चिमुकल्यांना हायडोज इंजेक्शन टोचून त्यांना संपविल्यानंतर डॉ. सुषमा राणे हिने तिघांच्याही मृतदेहावर फुले वाहून श्रद्धांजली दिली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, पती व मुलांची हत्या करण्याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, प्रा. धीरज राणे आणि मुले ध्रुव आणि लावण्या या तिघांचा डॉ. सुषमा हिने हायडोज इंजेक्शन टोचून खून केला. या हत्याकांडाचे प्लानिंग डॉ. सुषमा हिने गेल्या आठवड्याभरापासूनच केले होते. त्यानुसार सुषमाने रुग्णालयातून ॲनेस्थेसियाचे इंजेक्शन आणि झोपेच्या गोळ्या घरात आणून ठेवल्या होत्या. पतीला मुले आणि पत्नीची गरज नसल्याचे लक्षात आले होते. याच कारणामुळे डॉ. सुषमा आणि धीरज यांच्यात कडाक्याचे भांडणही झाले होते. 


उघडून तर बघा - ऑनलाईन काजू, विलायची मागवताय, जरा थांबा... अमरावतीत घडली ही घटना
 

तेव्हापासूनच डॉ. सुषमा हिने तिघांचाही खून करून स्वतःलाही संपवून टाकण्याचे ठरविले असावे. गेल्या आठवड्याभरापासून डॉ. सुषमाचा स्वभावही बदलल्याचे आत्या प्रमिला शास्त्रकार यांच्या लक्षात आले होते. यासोबतच डॉ. सुषमा आणि धीरजमध्ये सोमवारी रात्री ११ वाजता कारमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. आज रात्रीच ‘कांड’ करण्याचे सुषमाने ठरविले होते. दोन्ही चिमुकल्यांना वरण-भातातून झोपेच्या गोळ्या मिसळून झोपविण्यात आले तर पतीला चहातून झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या.

तिघेही गाढ झोपेत असताना सुषमाने ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन दिले. रात्रभर ती मृतदेहाजवळ बसून होती. सकाळी उठून तिने ॲक्टिवाने बाहेर जाऊन फुले विकत आणली. तिघांच्याही मृतदेहाला फुले वाहून सुषमाने स्टोअर रूममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोराडी पोलिसांनी चौघांच्याही आत्महत्येची नोंद केली आहे. 

‘माझ्या उच्चशिक्षित असलेल्या प्राध्यापक पतीला अशा दयनीय अवस्थेत पाहू शकत नाही. तो खूप खचला आहे. त्यामुळे असा निर्णय घेत आहे.’ असे डॉक्टर असलेल्या पत्नीने सुसाईड नोटमध्ये लिहिले. त्यानंतर पतीला आणि दोन्ही केविलवाण्या चिमुकल्यांना इंजेक्शन दिले, अशा माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. धीरज डिगंबर राणे यांचे आई-वडील ते लहान असतानाच दगावले. अनाथ झालेल्या धीरजला आत्या प्रमिला यांनी दत्तक घेतले. त्याचे पालनपोषण करून उच्चशिक्षित बनवले. एका नामांकित कॉलेजमधे प्राध्यापक पदावर धीरज कार्यरत होते. 

संपादन : अतुल मांगे 

जाणून घ्या - ‘बाळा... आईची काळजी घे, आता तुलाच सांभाळायचे आहे' वडिलांचे हे वाक्य मुलाला समजलेच नाही अन्...
 

१३ वर्षापूर्वी धीरज आणि उच्चशिक्षित सुषमा हिच्याशी विवाह झाला. सुषमा ही डॉक्टर असून नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. ध्रूव आणि लावण्या अशी दोन फुले त्यांच्या संसारवेलीवर उमलली. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत वाद सुरू होता. एकलकोंडा झालेल्या धीरज यांनी पत्नीला अडचण सांगितली होती. तेव्हापासून डॉ. सुषमासुध्दा अस्वस्थ होत्या. पतीला रोज तिळतिळ मरताना पाहून त्या बेचैन होत्या. शेवटी त्यांनी पतीसह स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पतीला ‘हायडोज’ असलेले इंजेक्शन दिले आणि स्वतःही गळफास घेतला, अशी माहिती आहे.


मोबाईलचा काढला सीडीआर

राणे दाम्पत्य मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी प्रा. राणे आणि डॉ. सुषमा या दोघांच्याही मोबाईलचा सीडीआर काढला आहे. कॉल डाटा चाचपडून पाहण्यात येत आहे. दोघेही रात्री-बेरात्री कुणाकुणाशी बोलले याचीही पोलिस तपासणी करीत आहे. कुण्या मित्र-मैत्रिणीशी चॅटिंग किंवा कॉल असल्यास त्यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.

go to top