दिल्लीवरून परत आलेल्या तरूणीच्या वडिलांचे नोकरीतून का झाले निलंबन, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020


चनकापूर येथील तरूणी दिल्ली येथे शिक्षणाच्या कामासाठी गेली. तिथून परत गावला आली. दरम्यान तिला ताप आला. तिला क्‍वारंटाइन केल्यानंतर तिचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, अन्‌ पुढे काय घडले ते वाचा...

खापरखेडा (जि.नागपूर) :  वेकोलि चनकापूर वसाहतीतील एका वेकोलि कर्मचाऱ्याची मुलगी दिल्लीवरून 8 जून रोजी विमानाने प्रवास करून चनकापूर येथे घरी वापस आली. यादरम्यान मात्र संबंधित स्थानिक प्रशासनाला मुलीच्या वडिलांकडून माहिती देण्यात आली नसल्यामुळे प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी नागपूर क्षेत्र महाप्रबंधक गोखले यांनी नुकतेच कोरोनाबाधित मुलीच्या वडिलांना निलंबित केले आहे.

अधिक वाचा : ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातच विजेचा खेळखंडोबा, वाचा काय आहे प्रकार
 
 प्रशासनाची दिशाभूल केली
चनकापूर वेकोलि "बी' टाइप वसाहतीत राहणारी मुलगी दिल्ली येथे शिक्षणासाठी गेली होती, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीवरून घरी आल्यानंतर त्या मुलीला घरीच वेगळ्या रूममध्ये क्वारंटाइन ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. पण, मुलीच्या वडिलांनी स्थानिक प्रशासनाची दिशाभूल केली असून त्यांनी मुलीला घरीच ठेवले. ग्रामपंचायत अथवा आरोग्य विभाग, पोलिस विभाग अथवा वेकोलि प्रशासनाला सांगणे गरजेचे समजले नाहीत. अचानक मुलींची तब्येत शुक्रवारी बिघडली असताना तिला वलनीतील वेकोलिच्या रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतरही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे लक्षणे संशयित वाटताच लागलीच रुग्णवाहिकेने नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

हेही वाचा : सावधान ! पावसाळयात होउ शकतो पिपरी गावाला धोका, कारण...

वडिलांचा ठरला हा गुन्हा
दरम्यान, तिचा स्वॅब घेऊन कोव्हिड चाचणी करण्यात आली. शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तारांबळ उडाली. लागलीच वेकोलि प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी "बी' टाइप वसाहतीत जाऊन भेट देण्यात आली. एकीकडे स्थानिक प्रशासनात या विषयाबाबत वेकोलिविरोधात प्रचंड संताप संचारला होता. याचा परिणाम म्हणून वेकोलिच्या महाव्यवस्थापकाने मुलीच्या वडिलांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. कोरोनाबाधित युवतीमुळे वेकोलि वसाहतीतील राहणाऱ्या व संपर्कात येणाऱ्यांना, वेकोलि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांला क्वारंटाइन व्हावे लागले, हे विशेष. प्रस्तुत प्रतिनिधीने सिल्लेवाडा वेकोलि प्रबंधक राजेंद्र ठाकरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, वेकोलि चनकापूर वसाहतीतील कोरोनाबाधित प्रकरणातील मुलीच्या वडिलांना पुढील आदेशापर्यंत वेकोलि प्रशासनाने निलंबित केले आहे, असे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspension of the girl's father who returned from Delhi