ताडोब्यात धुमाकूळ घालणारा वाघ गोरेवाड्यात जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

देशातील वाघांचे संवर्धन झाले, तर पर्यावरणाचे रक्षण करणेही शक्‍य होईल. तसेच जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करता येईल. त्यामुळे देशातील वाघांची संख्या वाढवण्याची गरज असून तसे प्रयत्न ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरू आहेत. जगातील वाघांच्या एकूण संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात असून, ताडोबाच्या व्याघ्रगणनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. इतकेच नव्हे तर देशातील वाघांची संख्या वाढत असल्याचे देखील प्रकर्षाने समोर येत आहे. 

नागपूर : देशातील वाघांचे संवर्धन झाले, तर पर्यावरणाचे रक्षण करणेही शक्‍य होईल. तसेच जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करता येईल. त्यामुळे देशातील वाघांची संख्या वाढवण्याची गरज असून तसे प्रयत्न ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरू आहेत. जगातील वाघांच्या एकूण संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात असून, ताडोबाच्या व्याघ्रगणनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. इतकेच नव्हे तर देशातील वाघांची संख्या वाढत असल्याचे देखील प्रकर्षाने समोर येत आहे. 

वाघांची संख्या वाढविण्यासाठी जसे प्रयत्न सुरू आहेत. तसेच धुमाकूळ घालणाऱ्या वाघांना देखील नियंत्रणात ठेवण्याचे कसोटीचे प्रयत्न वनविभागातर्फे सुरू आहेत. मानव व जंगली श्वापदांमधील संघर्ष रोखण्यासाठी प्रगत उपाययोजना जशा राबविण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर जिवीतहानी टाळण्यासाठी देखील ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पात विविध उपाय योजना अमलांत आणण्यात येत आहेत. 

वाचा : नागपूरकरांनो  लॉकडाऊन 5.0 साठी तयार राहा... हे वागणं बरं नव्हं

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात धुमाकूळ घालणाऱ्या केटी-1 नर वाघास नुकतेच जेरबंद करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली असून, गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात या वाघाला आणण्यात आले आहे. सहायक वनसंरक्षक एम. सी. खोरे, डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या चमूने ही कारवाही केली. केटी-1 वाघाचे गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात दुपारी 2.40 वाजता आगमन झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. शिरीष उपाध्ये यांनी वाघाची तपासणी करून हस्तांतरण प्रक्रियेस प्रारंभ केला. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाघास पिंजऱ्यात टाकण्यात आले आहे. याप्रसंगी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, सहायक वनसंरक्षक-2 एच. व्ही. माडभुषी, डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलंगथ व डॉ. शालिनी ए.एस. यांनी वाघाचे नमुने तपासणीत सहयोग केला. 
..... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tadoba"s tiger was arrested in Gorewada