वर्क फ्रॉम होम करताय ? कशी घ्यायची डोळ्यांची काळजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

सतत लॅपटॉप अथवा फोनच्या स्क्रिनवर बघून डोळ्यांवर ताण येतो. डोळे दुखू लागतात त्यामुळे काम करताना डोळ्यांची विशेष काळजी घ्या.

नागपूर : अलिकडे कामाचे स्वरुप बदलले आहे. बहुतेकांची कामे संगणकावर होतात. सतत आठ-दहा तास संगणकावर काम केल्याने अनेकांना पाठीचे, डोळ्यांचे त्रास होतात. सध्या तर लॉकडाऊनमुळे अनेक कमर्चारी घरीच सुमारे आठ ते दहा तास लॅपटॉपवर काम करीत आहेत. अनेक विद्याथीर्ही लॅपटॉपचा वापर करतात. मात्र, सतत लॅपटॉपसमोर बसणे डोळ्यासाठी त्रासदायक ठरू शकते. सतत स्क्रिनवर बघत राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. तासनतास स्क्रिनसमोर बसल्याने ड्राय आईजची समस्या निर्माण होऊ शकते.
"मेडीकल रिसर्च ऍड ओपिनियन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार सतत लॅपटॉपचा वापर केल्याने डोळे कोरडे पडण्याची समस्या निर्माण होते व त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नव्हे तर तुमच्या कायर्क्षमतेवरही होऊ शकतो. ड्राय आईज म्हणजे डोळ्यांचा ओलावा कमी होणे, डोळ्यांमध्ये अश्रू किंवा पाणी कमी बनणे, डोळे कोरडे वाटणे, खाज किंवा जळजळ होणे, डोळे सतत चोळावेसे वाटणे ही त्याची लक्षणे असू शकतात. त्याशिवाय डोळ्यांमध्ये सतत काही तरी गेल्यासारखे वाटणे, डोळे बारीक होणे अशीही लक्षणे असतात. घरी बसून काम करताना कशी काळजी घ्यायची जाणून घ्या.
सतत लॅपटॉप अथवा फोनच्या स्क्रिनवर बघून डोळ्यांवर ताण येतो. डोळे दुखू लागतात त्यामुळे काम करताना डोळ्यांची विशेष काळजी घ्या.

सविस्तर वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन...

 •  लॅपटॉप आणि मोबाईल डोळ्यांपासून ठराविक अंतरावर ठेवा
 • ृृ- अगदी जवळून मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एकटक पाहण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. म्हणूनच डोळ्यांमध्ये आणि इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट अथवा कंप्युटर स्क्रीनमध्ये योग्य अंतर ठेवा.
 • - दर अर्धा तासाने स्क्रीनपासून नजर हटवून इतर गोष्टींकडे पाहा.
 • - शिवाय दर वीस मिनिटांनी डोळ्यांची सतत उघडझाप करा.
 • - दर एक तासाने स्क्रीनपासून थोडं लांब जा. काम करताना दर एक तासाने पाच मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या आणि लॅपटॉपपासून जरा दूर जा. हे छोटे छोटे उपाय तुमच्या डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतील.
 • - डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात बीटा केरोटिन, ल्युटेन, ओमेगा 3 ऍसिड, व्हिटॅमिन ए आणि सी या पोषक मुल्यांची गरज असते. म्हणूनच उन्हाळ्यात पोषक आणि संतुलित आहार घ्या. ज्याचा परिणाम तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर होईल.
 • -जर तुमची झोप झाली नाही तर तुमचे डोळे दिवसभर जड होतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी आणि शांत झोप घेणं फार गरजेचं आहे.
 • काम करताना बसण्यासाठी योग्य जागेची निवड करावी. साधारण ऑफिसमध्ये बसतो तसं खुर्चीवर बसून काम करा पाय जमिनीला टेकवून बसणं महत्त्वाचं आहे. आरामात बसून काम करा.
 • बेडवर बसून काम करत असाल तर पाठीमागे सपोर्ट घेणं गरजेचं आहे. बसताना पाठीमागे उशी घ्या.
 • खाली मान घालून काम केल्यास मान दुखण्याची शक्‍यता दाट असते तसेच डोळेही दुखू शकतात त्यामुळे स्क्रिन आणि डोळ्यांची लेव्हल एक ठेवा.
 • लॅपटॉपवर काम करताना हाताची पोझिशन नीट ठेवा. म्हणजे काम करायला सोपे जाईल आणि हातही दुखणार नाहीत.
 •  काम करताना अनेकदा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांशी फोनवर बोलावं लागत त्यावेळी फोन नीट कानाला लावून बोला किंवा हेडफोन्सचा वापर करा.
 •  काम करताना खूप तास एकाच ठिकाणी बसू नका. यामुळे अंग दुखू शकतं त्यामुळे मधेच पाय मोकळे करायला थोड चाला.
 •  अनेकदा काम करताना लॅपटॉप मांडीवर ठेवला जातो. मात्र असं बसून काम करू नका. लॅपटॉप टेबलवर ठेवा किंवा मांडीवर घेण्याऐवजी त्याखाली उशी घ्या.
 •  काम करण्याची जागा निश्‍चित करा म्हणजे काम करायलाही उत्साह वाटेल. काम करताना जास्त ताण येणार नाही.
 • ऑफिसमध्ये काम करताना टी ब्रेक, लंच ब्रेक असतो. वर्क फ्रॉम होम करताना ही छोटा ब्रेक घ्या म्हणजे काम करताना कंटाळा येणार नाही. तसेच पोषक आहार घ्या.

ऍन्टी रिफ्लेक्‍शन कोटींग वापरावे
सतत दोन महिने आणि सलग सहा तास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम केल्याने, डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांचे आरोग्य बिघडते. त्यासाठी काम करतांना दर एक तासात 15 मिनिटांचा ब्रेक घ्या, डोळ्याची उघडझाप करा, डोळ्यांवर थंड पाणी मारा या प्राथमिक उपायांमुळे आपले डोळे आरोग्यदायी राहण्यास मदत होते. याशिवाय ज्यांना चष्मा आहे अशांनी ऍन्टी रिफलेक्‍शन कोटींगचा वापर केल्यास त्यांना लाभ होईल.
डॉ. अशोक मदान, नेत्रतज्ज्ञ, नागपूर.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of your eyes