महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी घेतली रेल्वेतून उडी, काय झाले असावे?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 February 2020

खाली उतरण्यापूर्वीच रेल्वे हळूहळू पुढे सरकू लागली होती. मुलाने गाडीतून सामान फलाटावर फेकले आणि स्वत: उडी घेतली. तोवर गाडीने थोडी गती घेतल्याने इंदू यांना उतरता येत नव्हते. तरीही हिंमत करून त्यांनी उडी घेतली. परंतु, त्या अडखडल्या. त्यांचे संपूर्ण शरीर फलाटावरून लोंबकळ होते आणि फरफटत पुढे जात होत्या. 

नागपूर : पती-पत्नी व मुलगा असे तिघे जण महाशिवरात्रीनिमित्त नागपुरात आले होते. शंकराचे दर्शन घेतल्यानंतर तिघांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते नागपूर रेल्वेस्थानकावर आहे आणि रेल्वेत जाऊन बसले. मात्र, काही वेळातच चुकीच्या गाडीत बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलाने सामान बाहेर फेकून उडी घेतली. मात्र, आईला धावत्या गाडीतून उडी घेणे जमले नाही. उडी घेताना अडखडल्यामुळे त्या फरफटत जाऊ लागल्या. टीसीने प्रसंगावधान साधून महिलेला जीवनदान दिले. इंदू दापोडीमारे (रा. काचुरवाही, रामटेक) असे प्रवासी महिलेचे नाव आहे. 

महाशिवरात्री असल्याने दर्शनासाठी इंदू या पती आणि मुलासोबत नागपुरात आल्या होत्या. दर्शन आटोपून गावी परतण्यासाठी तिघेही नागपूर स्टेशनवर आले. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक दोनवर 12622 दिल्ली-चेन्नई तामिलनाडू एक्‍स्प्रेस उभी होती. तिघेही जनरल डब्यात बसले. गाडी पुढच्या प्रवासासाठी निघाली. त्याचवेळी चुकीच्या गाडीत बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. 

असे का घडले? - एका रात्री उपाशीपोटी  झोपले भीमराव, सकाळी उठलेच नाही

खाली उतरण्यापूर्वीच रेल्वे हळूहळू पुढे सरकू लागली होती. मुलाने गाडीतून सामान फलाटावर फेकले आणि स्वत: उडी घेतली. तोवर गाडीने थोडी गती घेतल्याने इंदू यांना उतरता येत नव्हते. तरीही हिंमत करून त्यांनी उडी घेतली. परंतु, त्या अडखडल्या. त्यांचे संपूर्ण शरीर फलाटावरून लोंबकळ होते आणि फरफटत पुढे जात होत्या. 

गाडीच्या आतमध्ये असणारे पती देवीदास आणि बाहेर असणारा मुलगाही हतबल होता. गाडी स्टेशनबाहेर निघण्याच्या तयारीत असतानाच कर्तव्यावर असणारे मध्य रेल्वेचे तिकीट तपासणीस अमित बराली आणि हल्दीराम स्टॉलचे सहायक व्यवस्थापक अभिषेक ब्राह्मणकर दोघेही मदतीसाठी सरसावले. कर्तव्यावर असणाऱ्या टीसीने प्रसंगावधान राखल झडप घालून महिलेला फलाटाकडून ओढून जीवदान दिले. 

हे कसं शक्य आहे? - Video : बॉक्‍सर मुलाच्या अंत्ययात्रेत वडिलांनी वाजवला 'डीजे', हे आहे कारण...

प्रसंग सीसीटीव्हीत कैद

अमित यांनी झडप घालत इंदू यांना फलाटाच्या दिशेने ओढून घेतले. अगदी काही सेकंदांची चुकामूकही जीवघेणी ठरू शकली असती. हे दृष्य बघाणाऱ्या प्रवाशांचा श्‍वास काही वेळेसाठी रोखला गेला होता. नागपूर रेल्वेस्थानकावर घडलेला हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TC rescues woman's life at Nagpur railway station