रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्यासाठी चहाचा झाला मोठा वापर, आणि आली ही बातमी...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

टाळेबंदीच्या काळात अनेकांनी परिवारासोबत मोकळा वेळ घालविला. तेव्हा खवय्ये वेगवेगळ्या खाण्याच्या डिशवर ताव मारत असताना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काळेमिरे, हळद, दालचिनी, तुळस, गवती चहा आदींचा वापर करून चहा पिणाऱ्यांची संख्याही वाढली होती. त्यामुळे अचानकच चहाच्या विक्रीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

 

 नागपूर :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच व्यवसायांना घरघर लागली असताना चहापत्तीच्या व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आलेत. चहा हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रामबाण उपाय असल्याचे संशोधकांनी सांगताच विक्रीत 20 टक्के वाढ झाली. दुसरीकडे मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभर टाळेबंदी असल्याने मळ्यातील चहाच्या पानाची तोडाई निम्म्यावर आल्याने चहाच्या दरात प्रति किलो 50 रुपयांची वाढ झालेली आहे. 

भारतीय संशोधकांना कोरोनावर चहा हे रामबाण उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्लॅक टी हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य पर्याय आहे. कारण, चहा हे अँटी व्हायरल गुणधर्म असलेले सर्वांत नैसर्गिक अँटिऑक्‍सिडेंट पेय आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी चहा पिणे आवश्‍यक आहे, असा दावा डॉक्‍टर प्रीतम चौधरी यांनी केला. त्यावर अनेकांनीही शिक्कामोर्तबही केले. त्यामुळे चहा विक्रेत्यांच्या व्यवसायाला झळाळी आलेली आहे.

हेही वाचा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऊर्जामंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय...

टाळेबंदीच्या काळात अनेकांनी परिवारासोबत मोकळा वेळ घालविला. तेव्हा खवय्ये वेगवेगळ्या खाण्याच्या डिशवर ताव मारत असताना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काळेमिरे, हळद, दालचिनी, तुळस, गवती चहा आदींचा वापर करून चहा पिणाऱ्यांची संख्याही वाढली होती. त्यामुळे अचानकच चहाच्या विक्रीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

भारतातील चहाची चव ही जगभरात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतातून चहाची मोठ्या प्रमाणात निर्यात होणार नसली तरी देशातील चहाची मागणी वाढली असताना उत्पादन घटल्याने भाव चढेच राहणार आहे. देशभरात दोन लाख पन्नास हजार चहा उत्पादक आहे. भारतात गेल्या वर्षी 135 किलोग्रॅम चहाचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र चहा माळ्यातील चहा तोडाईच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सलग दीड महिने चहाची तोड बंद होती. आता सामाजिक अंतराचे पालन करून चहाच्या माळ्यातून चहाची तोड होत असल्याने निम्म्याच चहाची तोड झालेली आहे. 

 

देशात यंदा कोरोनामुळे चहाचे उत्पन्न पन्नास टक्‍क्‍यांनी कमी झालेले असताना मागणी वाढलेली आहे. त्यामुळे यंदा चहाच्या दरात प्रति किलो 50 रुपयांनी वाढ झालेली आहे. यात अजून वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
अनिल अहीरकर, माजी अध्यक्ष, विदर्भ टी मर्चंट असोसिएशन. 

 

  • चहाचे प्रकार : पूर्वीचे भाव: आताचे भाव (प्रति किलो रुपये) 
  • सर्वसाधारण :      160 :               210 
  • मध्यम :              240                300 
  • उच्च :                300                350 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tea Rate Increased By 50 Rs.