भाऊ, चहाचे दुकान उघडन का?चहा टपरीवाल्यांसमोर प्रश्न पोटापाण्याचा!

Tea stall owners are in financial crisis
Tea stall owners are in financial crisis
Updated on

नागपूर  : माह्या घरी माई बायको, मी, पोरगी आन बुढा-बुढी बी संगच रायते. घरामध मी यकटांच कमावनारा. जे काई थोडं फार खातो ते चहा टपरीच्या भरवशावर. पन भाऊ तीन महिने झाले चहाचं दुकान बंद करून. काम कोनत करावं आन कस खावं या विचारामुडे मन खचू रायल. का वाट्टे भाऊ, दारूचे दुकान उघडू रायले, मंग चहा टपरीबी उघडन का? हा केविलवाणा प्रश्न आहे रामदासपेठेतील चहा विक्रेता मनोज सेलोकार यांचा.

लॉकडाऊनमुळे चहाचे दुकान दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यातच लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये चहा टपरी उघडण्याची परवानगी न मिळाल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अजूनही चहाचे दुकान कधी उघडले याचा अंदाज नाही. चहा तर्री पोहा आणि नागपूरकर यांचे अतूट नाते आहे. नुकतीच ब्रँडेड चहाची दुकाने शहरामध्ये सुरू झाली आहेत. मात्र, वर्षानुवर्षे टपरीवर चहा विकणाऱ्यांची आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या देखील तितकीच आहे. सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी चहाविक्रेते करत आहेत.
उपराजधानीमध्ये हिवाळा पावसाळ्यासह उन्हाळ्यात देखील चहा प्रेमींची चहा टपरीवर गर्दी होते. शहरातील प्रत्येक कार्यालयासमोर, चौका चौकात चहा टपरी पाहायला मिळते. त्यावर, नागपूरकर तुटून पडलेले दिसतात. विशेषतः, सिव्हिल लाईन, धंतोली, रामदासपेठ, धरमपेठ अशा विविध परिसरामध्ये शे-दोनशे चहा टपरी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे चहा व्यावसायिक आपला व्यवसाय करीत आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये चहा व्यवसायाला अद्याप सूट न मिळाल्याने हे चहा टपरीवाले संकटात सापडले आहे.

यातील अनेक व्यावसायिकांनी चहाच्या वेगवेगळ्या शाखा उघडल्या आहेत. तर अनेक परप्रांतीय चहाविक्रेते यावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. परप्रांतीय चहाविक्रेत्यांना गावाला परतायचे आहे. तर, जुन्या चहा विक्रेत्यांना उतरती कळा लागली आहे. अनेक परप्रांतीय चहा विक्रेत्यांचे स्टॉल शहरातील मुख्य परिसरात आहेत. चहा व्यवसायावरच त्यांची गुजराण होते. परंतु, आता काम नसल्याने त्यांचेसुद्धा हाल होत आहे. पावसाळ्यातही चहा विक्रीवर कोरोनाचा प्रभाव राहील, असा अंदाज चहा व्यावसायिकांनी व्यक्त केला.

मानसिकरित्या खचलो

गेल्या तीन महिन्यापासून माझे दुकान बंद आहे. या दरम्यान इतर काम शोधायचा प्रयत्न केला. मात्र, अशा परिस्थितीमध्ये तेही मिळाले नाही. काही कामांना विशेष प्रशिक्षण लागत असल्याने ते करणे शक्य नाही. त्यामुळे, कुटुंबियांचे पोट कसे भरावे हा प्रश्न आहे. या सर्व विचारांमुळे मानसिकरित्या खचून जातो आहे.
मनोज सेलोकार, चहा विक्रेता, रामदासपेठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com