हुश्श....परीक्षेचा तांत्रिक लोच्या संपला !

file photo
file photo

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्यात. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून ॲप सदर्भातील तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागला. मात्र, त्यानंतरही जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. दरम्यान परीक्षेचा तांत्रिक लोच्या संपला असून सहाव्या दिवसाच्या परीक्षा सुरळीत पार पडल्यात. विशेष म्हणजे, आज विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे प्रमाणही घटल्याने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला दिलासा मिळाला.

विद्यापीठाकडून आज जवळपास २३ हजारावर विद्यार्थ्यांनी चार टप्प्यात परीक्षा दिली. यामध्ये बीएसह इतर परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान काही विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यासाठी सुरुवातीला त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. या समस्येचे लवकरच समाधान करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मात्र, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने ते परीक्षा देऊ शकले नाहीत. विद्यापीठाने तयार केलेल्या ॲपच्या बऱ्याच समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रथम दोन दिवस ओटीपीची समस्या विद्यार्थ्यांना भेडसावली. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेत नोंदणी करताना आणि पेपर झाल्यावर तो सबमिट करताना बराच त्रास झाला. मात्र, यावर प्रशासनाद्वारे परीक्षा देणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे पेपर सबमिट झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे दुसऱ्याच शुक्रवारी (ता.९) दिवशी विद्यापीठाला तीन टप्प्यातील परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. आज परीक्षा सुरळीत पार पडल्याने विद्यापीठाचा आत्मविश्वास दुनावला आहे.

ॲप झाले रिफ्रेश
विद्यापीठाच्या ॲपमुळे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता विद्यापीठाने ॲपचे कोड ऑप्टीमाईझ आणि त्यातील कम्पोनंट फाईन ट्युन केले आहे. त्याचा रिझल्ट आजच्या परीक्षेमध्ये दिसून आला. आता विद्यार्थ्यांना कुठलीही समस्या येणार नसल्याच्या दावा विद्यापीठाने केला आहे.

पहिला दिवस - २,८०३-२,७२१
दूसरा दिवस - २,८०६- १,५४६
तिसरा दिवस - २,४४१ - २,३४४
चौथा दिवस - १५,७३४ -५,४४७
पाचवा दिवस - ९,७८२- ९,१७५
सहावा दिवस - २३,६९५ - २१,१६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com