हॉटपूर? नागपूर @ 47! नागपूर देशात तिसरे आणि अकोला चक्क जगात पाचवे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

जगात सर्वाधिक तापमानाची नोंद इराकच्या तुझ शहरात 50.5 अंश सेल्सिअस झाली. नागपूरचे (47 अंश सेल्सिअस ) तापमानही देशात पाचव्या व जगात अकराव्या स्थानावर राहिले

नागपूर  : विदर्भात नेहमीप्रमाणेच उन्हाने उग्र रुप धारण केले आहे.
पारा दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यातच कडक उन्हासाठी प्रसिद्ध असलेल्या नवतपाने अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी विदर्भाला दणका दिला. सोमवारी अकोला येथे कमाल तापमानाने पहिल्यांदाच 47.4 अंशांवर उसळी घेतली, तर नागपुरातही पारा 47 अंशांवर पोहोचला. अकोल्याचे आजचे तापमान जगात तिसऱ्या स्थानावर राहिले. विदर्भात आणखी दोन दिवस उन्हाची तीव्र लाट राहणार आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाच्या लाटेचा प्रभाव आजही दिसून आला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तीव्र चटके जाणवत आहेत.  लाटेचा सर्वाधिक फटका अकोला आणि नागपूरला बसला. चोवीस तासांत अकोल्याच्या तापमानात 1.3 अंशांची वाढ होऊन यंदाच्या मोसमातील 47.4 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकाची नोंद झाली. जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या 'एल डोराडो' संकेतस्थळानुसार, येथील तापमान देशात चुरूनंतर दुसऱ्या, तर जगात तिसऱ्या स्थानावर राहिले. जगात सर्वाधिक तापमानाची नोंद इराकच्या तुझ शहरात 50.5 अंश सेल्सिअस झाली. नागपूरचे (47 अंश सेल्सिअस ) तापमानही देशात पाचव्या व जगात अकराव्या स्थानावर राहिले. विदर्भातील चंद्रपूर (46.8 अंश सेल्सिअस ), अमरावती (46 अंश सेल्सिअस ), वर्धा (46 अंश सेल्सिअस ) या जिल्ह्यांमध्येही उन्हाचा तडाखा जाणवला.

सविस्तर वाचा - वस्त्रनिर्मिती व्यावसायिकांना अंतरिम दिलासा नाकारला

हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट असल्याने मंगळवारीही तापमानात वाढ अपेक्षित आहे. उन्हामुळे शरिरातून दिवसभर घामाच्या धारा वाहिल्या. रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवल्या.                                                                                            


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature of Nagpur is 47 degree