पती-पत्नीतील तणाव 40 टक्‍क्‍यांनी वाढला : प्रा. राजा आकाश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

देशामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील कामकाज थांबले. त्यामुळे, कौटुंबिक कलहामुळे तणावात जगणाऱ्या जोडप्यांचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे मत प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. अशा जोडप्यांच्या समस्यांचे वेळेत समाधान न झाल्यास अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होतील.

नागपूर : लॉकडाउनमध्ये तणावात जगणाऱ्या पती-पत्नीला व्यक्त होता येत नाही. त्यांच्यामधील तणाव आतल्या आत धुमसतो आहे. आपण समुपदेशन करावे असे अनेक जोडप्यांना वाटते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ही जोडपी समुपदेशनासाठी यायला तयार नाहीत. चाळीस ते पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत जोडप्यामधील ही समस्या वाढली आहे, असे मत कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. 

देशामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील कामकाज थांबले. त्यामुळे, कौटुंबिक कलहामुळे तणावात जगणाऱ्या जोडप्यांचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे मत प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. अशा जोडप्यांच्या समस्यांचे वेळेत समाधान न झाल्यास अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होतील. स्वभाव न जुळणे, संशयी वृत्ती, सासू सासऱ्यांशी न पटणे, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे, अपेक्षा, अहंकार अशा विविध कारणांमुळे जोडप्यांमध्ये खटके उडत असतात. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीदेखील याच कारणांमुळे जोडप्यांमध्ये तणाव निर्माण व्हायला. मात्र, याचे प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढले आहे. 

हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण

शिवाय, कामानिमित्त व्यक्ती 8 ते 10 तास घराबाहेर राहू शकत होता. परंतु, या काळात नवरा बायको दोघेही पूर्ण वेळ घरीच असल्याने त्यांच्यात होणाऱ्या वादाचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या सर्व समस्या जोडप्यांना कुणाजवळ व्यक्तसुद्धा करता येत नाही. चीन आणि अमेरिकेमध्ये लॉकडाउन हटविल्यानंतर अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेतला. अशा पती पत्नीचे वेळेत समुपदेशन न केल्यास भारतातदेखील हीच परिस्थिती उद्‌भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये तणाव वाढत गेल्यास नवऱ्याला क्वारंटाइन करण्याचा निर्णयसुद्धा पुणे जिल्हा परिषदेमध्ये घेतला आहे. हीच परिस्थिती शहरामध्ये उद्‌भवल्यास स्थानिक प्रशासन हा पर्याय निवडण्याची शक्‍यता आहे, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tensions between husband and wife increased