esakal | घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा शहरात धुडगूस; पोलिस अधिकाऱ्याच्या घरीच केली चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Theft at the home of a police officer Nagpur crime news

संधी साधून चोरट्याने राजा पवार यांच्या घराचे कुलूप तोडले. आलमारीतील मंगळसूत्र, सोनसाखळी, सोन्याची अंगठी व २० हजारांच्या रोख रकमेसह सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरी केला.

घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा शहरात धुडगूस; पोलिस अधिकाऱ्याच्या घरीच केली चोरी

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी शहरात धुडगूस घातला आहे. शहरात एका दिवसात सरासरी दोन ते तीन घरफोडीचे गुन्हे दाखल होतात. आता तर पोलिस अधिकाऱ्यांचेही घरे सुरक्षित राहिलेले नाही. चोरट्यांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे घरफोडी करून रोख रकमेसह सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. राजा पवार असे पोलिस अधिकाऱ्यांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा पवार यांची नुकतीच पदोन्नतीवर राजुरा येथे बदली झाली. ते राजुरा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी आहेत. बदली झाल्याने पवार हे कुटुंबासह राजुरा येथे राहतात. त्यांचे वडील शेरासिंग गुलाबसिंग पवार (वय ८२) हे नागसेननगरमध्ये राहतात. सकाळ आणि सायंकाळी ते राजा पवार यांच्या घरी जातात.

संधी साधून चोरट्याने राजा पवार यांच्या घराचे कुलूप तोडले. आलमारीतील मंगळसूत्र, सोनसाखळी, सोन्याची अंगठी व २० हजारांच्या रोख रकमेसह सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरी केला. बुधवारी सकाळी शेरासिंग हे कुशीनगर येथील राजा पवार यांच्या घरी आले असता घरफोडीची घटना उघडकीस आली.

जाणून घ्या - सामान्य शेतकऱ्याची बायको ते महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्ष, वाचा कोण आहेत संध्या सव्वालाखे

पोलिस अधिकाऱ्याकडे घरफोडी झाल्याचे कळताच जरीपटका पोलिसांमध्ये खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जरीपटका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या अधिकाऱ्याच्या बाजूलाच निवृत्त सहायक पोलिस आयुक्तांचेही निवासस्थान आहे, हे विशेष...

संपादन - नीलेश डाखोरे