कापड व्यावसायिक अडकला अमरावतीत अन् नागपुरात घडला हा प्रकार

nagpur chori
nagpur chori

नागपूर : शहरात असलेली संचारबंदी आणि लॉकडाउनमुळे बाहेरगावी अडकलेल्या एका कापड व्यावसायिकाच्या घरी चोरी करून चोरट्यांनी 1 लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यनगर येथील गुरुद्वाराजवळ राहणारे विजय जवाहर चूग यांचे महाल येथे कपड्याचे दुकान आहे. 18 मार्च रोजी ते कुटुंबीयांसह अमरावती येथे सासूरवाडीला गेले होते. दरम्यान, त्याचदिवशी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे चूग कुटुंबीय अमरावती येथे अडकून पडले. चूग यांच्याकडे कुत्रा असल्याने त्याची देखभाल करण्यासाठी बाजूलाच राहणाऱ्या मोलकरणीला सांगितले होते. दरदिवशी सकाळी आणि सायंकाळी मोलकरीण कुत्र्याला जेवण देत असे. 

3 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास मोलकरणीने कुत्र्याला जेवण दिले आणि ती घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास मोलकरीण पुन्हा चूग यांच्या घरी आली असता गेटचे कुलूप तुडून पडलेले दिसले. तसेच घराचे दार सुरू होते. मोलकरणीने ही माहिती चूग यांचे भाऊ विजेंद्र चूग (रा. क्‍वेटा कॉलनी) यांना दिली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल, आणि रोख 25 हजार रुपये असा 1 लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. 

विजयचा सट्टेबाजीशी संबंध! 
विजय ऊर्फ चिंटू कळमन्यातील नामांकित क्रिकेट सट्टेबाज असून, त्याचे नाव विजय मोहोड हत्याकांडानंतर चर्चेत आले होते. यापूर्वी विजयवर सट्टेबाजीचे गुन्हे दाखल आहेत. विजय मोहोड हत्याकांडातील सर्वच आरोपींवर मोक्‍का लावण्यात आला. यात विजय फरार असल्याचे बोलले जाते. न्यायालयाच्या आदेशानुसार क्राईम ब्रॅंचने विजयच्या सूर्यनगरातील घरावर प्रोक्‍लोमेशनची नोटीस लावली होती. त्यानुसार विजयला 4 एप्रिलला न्यायालयात उपस्थित राहायचे होते. त्यातूनही तो फरार असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com