वृद्धेची कमाल! सोनसाखळी चोरून पळणाऱ्या चोराचे पकडून ठेवले जॅकेट; लाखोंची चेन सोडून चोरट्याने काढला पळ 

विजय वानखेडे 
Saturday, 7 November 2020

सकाळच्या वेळी दूध आणायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणाऱ्या चोरट्याचा डाव या महिलेच्या सतर्कतेने उलटला. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने महिलेची सोनसाखळी वाचली, परंतु चोरटा निसटला. 

वाडी (जि. नागपूर) ः शहरात भुरटे चोर पुन्हा सक्रिय आहेत. भुरटे चोर जात येत असलेल्या वृद्धांना आणि महिलांना लुटत आहेत. अशीच एक घटना आज शहरात घडली आहे. मात्र वृद्ध महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे चोरट्याचा डाव फसला, 

सकाळच्या वेळी दूध आणायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणाऱ्या चोरट्याचा डाव या महिलेच्या सतर्कतेने उलटला. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने महिलेची सोनसाखळी वाचली, परंतु चोरटा निसटला. 

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

दत्तवाडी येथील गजाजन सोसायटी निवासी सामाजिक कार्यकर्ते अनिल भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊर्मिला चौरसिया (वय ६५) या सैनिक चौकातून गजानन सोसायटीकडे सकाळी दूध घेऊन जात असताना अचानक एक व्यक्ती दुचाकीवर आला. त्याने ऊर्मिला यांच्या गळ्यावर थाप मारून सोनसाखळी ओढली. 

अचानक घडलेल्या या घटनेने महिला गोंधळली, परंतु स्वतःला सावरत त्यांनी चोरट्याचा अंगावरील जॅकेट पकडून ठेवले आणि मदतीसाठी आरडाओरड केली. परिसरातील अनिल भाटिया यांनी चोरट्याला पकडले. या प्रकाराने त्याने हातातील सोन्याची चेन फेकून दिली व पळायचा प्रयत्न करू लागला.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

दरम्यान ऊर्मिला चौरसिया चोरट्याला पकडूनच होत्या. धोका लक्षात येताच चोरट्याने त्यांच्या हाताला झटका मारून पळ काढला. याबाबत वाडी पोलिसांना सूचना देताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली. ऊर्मिला यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला. घटनेची माहिती मिळताच नवनियुक्त पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी व त्यांचे सहकारी पो.उ.नि.चोपडे घटनास्थळी पोहचले. चोरटा लवकरच गजाआड होईल असे पोलिसांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thief theft gold chain of woman but she holds his jacket