esakal | विश्वास बसेल का! एका उंदरामुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to house in fire in Wardha

नागरिकांनी प्रसंगावधान राखून घरातील सिलिंडर बाहेर काढले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाहता पाहता घराची राखरांगोळी झाली. आगीत कमला पाचरुटकर यांच्या घरातील साहित्य जळून राख झाले. परिसराती नागरिकांनी अर्धा तास अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली.

विश्वास बसेल का! एका उंदरामुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

sakal_logo
By
गजानन गारघाटे

गिरड (जि. वर्धा) : ‘दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला देवापाशी...’ साधारणत: अशी शुभंकरोती सायंकळाच्या वेळी म्हणण्याची प्रथा आहे. मात्र, वर्धेतील गिरड येथे तुळशीपाशी दिवा लावणे एका कुटुंबाल चांगलेच बेतले. दिव्याने अख्ख घर बेचीराख झाले. या आगीने वृद्धेचे कुटुंब उघड्यावर आले आहे. याला निमित्त ठरले उंदीर...

गिरड या गावात कमलाबाई पाचरुटकर राहतात. गुरुवारी (पाच नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वृद्ध कमला पाचरुटकर व त्यांची मुलगी घरात स्वयंपाक करीत होत्या. सायंकाळ झाल्याने मुलीने अंगात असलेल्या तुळशीजवळ दिवा लावला. यावेळी पेटत्या दिव्याची वात उंदीर घेऊन गेला. ही वात उंदीर घराजवळ संरक्षणासाठी लावलेल्या लाकडांजवळ घेऊन गेला. वातीच्या आगीने लाकडांनी पेट घेतला.

अधिक वाचा - बेपत्ता 'वीर' 12 तासांत आढळला; घुग्घुस ते नागपूर प्रवासाचे गूढ गुलदस्त्यात

यानंतर उदीर घराबाहेर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर गेला. वातीला असलेल्या आगीने कचऱ्याने पेट घेतला. पाहता पाहता ही आग घराजवळ पोहोचली. आगीत घर बेचिराख झाले. आगीचे लोट निघताच परिसरातील नागरिकांनी कमला पाचरुटकर व त्यांच्या मुलीला बाहेर काढले. गावकऱ्यांनी घेतलेल्या सतर्कतेने घरातील नागरिकांना वेळेत बाहेर काढल्याने जीवितहाणी टळली. मात्र, आगीत वृद्धेचे एक लाखाचे नुकसान झाले.

नागरिकांनी प्रसंगावधान राखून घरातील सिलिंडर बाहेर काढले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाहता पाहता घराची राखरांगोळी झाली. आगीत कमला पाचरुटकर यांच्या घरातील साहित्य जळून राख झाले. परिसराती नागरिकांनी अर्धा तास अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली.

जाणून घ्या - नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव

नागरिकांच्या सर्तकतेमुळे माय लेकीचे प्राण वाचवले. घटनेची माहिती मिळताच गिरड पोलिस ठाण्याचे महैद्र सूर्यवंशी, संजय तिपार्टी, रवी घाटूर्ले यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला. घटनेची नोंद गिरड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पाहता पाहता ठिणगीचे रूपांतर आगीत

कमला यांच्या मुलीने अंगणात असलेल्या तुळशीजवळ दररोजच्या प्रथेप्रमाणे दिवा लावला. दिवा लावून दोघेही आपल्या घरकामाला लागल्या. स्वयंपाक आणि इतर कामात त्या गढून गेल्या होत्या. याचवेळी घरातल्या एका कोपऱ्यात त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसले. पाहता पाहता ठिणगीचे रूपांतर आगीत झाले आणि मोठी आग लागली.

हेही वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

उंदराचा प्रताप

आग आटोक्यात आणल्यानंतर आग लागल्याचा कारणाचा शोध घेतला असता सर्वांना धक्का बसला. उंदराने अंगणात तुळशीजवळ लावलेल्या दिव्याची पेटती वात पळवून नेल्याचे दिसले. ती वात अंगणातल्या कचऱ्यामध्ये पडली होती. वातीमुळेच आग लागल्याचे स्पष्ट झाले. सुदैवाने लोक धावून आल्याने माय-लेकींचा जीव वाचला.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top