नागपुरात दोन घरफोडीच्या घटना, २ लाख ६० हजार लंपास

thieves stolen 2 lakh 60 thousand rupees in two burglary incidents happened in Nagpur
thieves stolen 2 lakh 60 thousand rupees in two burglary incidents happened in Nagpur
Updated on

नागपूर : वेगवेगळ्या ठाण्यांतर्गत अज्ञात चोरांनी घरफोडी करून जवळपास अडीच लाख रुपयांच्या मुद्देमालावर हातसाफ केला. पहिली घटना कळमना पोलिस ठाण्याअंतर्गत घडली, तर दुसरी घटना कपिलनगर पोलिस ठाण्याअंतर्गत घडली. 

पहिल्या घटनेत ठाकरे लेआऊट निवासी रहमत खान शफी खान (४०)हे गेल्या ९ नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून कुटुंबासह चंद्रपूर येथे काकाच्या घरी गेले होते. दरम्यान, अज्ञात आरोपीने कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. सोन्याचांदीचे दागिने व रोख ३३ हजार, असा एकूण १,३०,००० रुपयांच्या मुद्देमालावर हातसाफ केला. शनिवारी सायंकाळी रहमत खान परतले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जाऊन तपासले असता दागिने व रोकड गायब होती. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देत तक्रार दाखल केली. 

दुसऱ्या घटनेत मसाळा निवासी वंदना शैलेष जांभुळकर (४४) रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून कुटुंबासह लग्न समारंभाला गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञात चोराने मुख्य दाराचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख १५ हजार, असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा माल चोरून नेला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जांभुळकर कुटुंब समारंभ आटोपून घरी परतले असता चोरी झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com