लॉकडाउनचा परिणाम: तिसऱ्या टप्प्यातील स्तन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयातील नोंदी

third stage breast cancer patients are increased due to lockdown
third stage breast cancer patients are increased due to lockdown

नागपूर : कोरोनाच्या संकटाला थोपवण्यासाठी मागील सात ते आठ महिन्यांचा काळ लॉकडाउनमध्ये होता. लॉकडाउन शिथिल झाले, परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने इतर आजारांच्या रुग्णांनी घरीच राहाणे पसंत केले. त्यातच सरकारने अनेक निर्बंध लावले होते. यामुळे वेदनादायी प्रसंग देखील रुग्णांनी सहन केले. अशातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या निदानासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या घसरली. लॉकडाउनंतर मात्र आलेल्या कॅन्सरग्रस्त महिलां तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील स्तन कॅन्सर घेऊन आल्याचे निरिक्षण येथील डॉक्टरांनी नोंदविले असल्याची माहिती पुढे आली.

ऑक्टोंबर स्तन कॅन्सरबाबत जागरुकता महिना पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती सांगण्यात आली. लॉकडाउनच्या प्रारंभी सर्वच आजाराच्या रुग्णांच्या विविध सुविधा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व यंत्रणा बंद होती. सर्वच सुविधा व प्रतिष्ठानांना कुलूप होते. त्यात दळणवळण व्यवस्था बंद असल्याने नागपुरात विविध आजारांच्या रुग्णांना येता येत नव्हते. 

वाहतुकीच्या साधनांअभावी रुग्णांना घरीच थांबावे लागले. लॉकडाउन शिथील झाल्यावर प्रवासी वाहतुकीची साधने सुरू झाली. मात्र सार्वजनिक वाहतूक बंद होती. गाव- खेड्यातून नागपुरात उपचाराला येणारे अनेक गरीब रुग्ण गावातच अडकले. त्यामुळे या रुग्णांना तपासणी करता आली नाही. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कॅन्सरचे निदान करता आले नाही. यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्यानंतर रुग्ण आता उपचाराला येत आहेत.

स्तनच्या कॅन्सरग्रस्तांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती डॉ. बी. के. शर्मा यांनी दिली.राष्ट्रसंत तुकडो महाराज कॅन्सर रुग्णालयाचे अतिरिक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे म्हणाले, कॅन्सरच्या रुग्णांना विविध शासकीय योजनांचा लाभ देत त्यांच्यावर योग्य उपचार केला जात आहे. दरम्यान या रुग्णालयात विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून उपचाराला येणाऱ्या कॅन्सरग्रस्तांची संख्या जास्त आहे. 

२०१९ मध्ये एकूण कॅन्सरग्रस्तांपैकी १५ टक्के रुग्ण स्तनाच्या कॅन्सरचे होते. ही संख्या २०१८ मध्ये १२.७० टक्के तर २०१७ मध्ये १४.३६ टक्के नोंदवली गेली आहे. कॅन्सरचे पहिल्या टप्यात निदान झाले तर रुग्ण हमखास बरा होतो. यामुळे लवकर निदानसाठी स्तन कॅन्सर जागरुकता महिन्यात मॅमोग्राफी यंत्रावर स्क्रिनिंग चाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला डॉ. सुधीर देशमुख, डॉ. प्रसन्ना जोशी, डॉ. प्रफुल्ल चहांदे, डॉ. मयुर डायगवणे, डॉ. वैभव चौधरी, डॉ. प्रशांत ढोके उपस्थित होते.

३० महिलांमध्ये एक महिलेस स्तन कॅन्सर

शहरात ३० महिलांमध्ये एका महिलेस तर ग्रामीण भागात ६० महिलांमध्ये एक महिलेस स्तन कॅन्सर असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. एकूण कॅन्सरपैकी ३० टक्के महिलांना स्तन कॅन्सर असतो, यातील ५० टक्के महिला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर घेऊन येतात. बदललेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव असल्याने येत्या २०२५ साली २२३८३२ महिला या कॅन्सरच्या विळख्यात असतील अशी शक्यता यावेळी वर्तविण्यात आली.


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com