esakal | शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Have you seen a dog without a tail read full story

प्राचीन रोममध्ये श्वानांचे शेपूट कापले जात होते. लोकांचा असा विचार होता की शेपूट कापल्याने रेबीज होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे त्याकाळी श्वानांचे शेपूट कापले जात होते. आता शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की श्वानांच्या शेपूटचा आणि रेबीजचा काहीही संबंध नाही. शेपूटच नसेल तर श्वान आपली भावना व्यक्त करण्यास सक्षम राहत नाही

शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का कापली असावी शेपूट? हे आहे कारण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक म्हणून श्वान ओळखला जातो. त्याच्या प्रामाणिकपणाचा अनुभव सर्वांनाच आहे. म्हणून अनेकांच्या घरी श्वान आपल्याला पाहायला मिळतो. मनुष्यही श्वानाची चांगली देखरेख करतो. परंतु, श्वानांशी संबंधित बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही. उदाहरणार्थ श्वानांची शेपूट का कापली जाते? चला तर जाणून घेऊया यामागील कारण...

शेपूट ही श्वानांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण, इतर श्वानांशी संवाद साधण्यासाठी ते याचा वापर करीत असताता. तसेच माणसांशी भावना व्यक्त करण्यासाठी, पळतांना संतुलन राखण्यासाठी करतात आणि पोहण्यासाठी करतात. मात्र, अनेक मालक पाळीव श्वानाची शेपूटच कापून टाकतात. श्वान लहान असतानाच शेपूट कापण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. परंतु, असं का करताता हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. कोणत्याही प्राण्याचे शेपूट कापण्याच्या प्रक्रियेस ‘डॉकिंग’ असे म्हणतात.

महत्त्वाची बातमी - ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजण्याचे संकेत, जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलमध्येही पोटनिवडणूक

प्राचीन रोममध्ये श्वानांचे शेपूट कापले जात होते. लोकांचा असा विचार होता की शेपूट कापल्याने रेबीज होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे त्याकाळी श्वानांचे शेपूट कापले जात होते. आता शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की श्वानांच्या शेपूटचा आणि रेबीजचा काहीही संबंध नाही. शेपूटच नसेल तर श्वान आपली भावना व्यक्त करण्यास सक्षम राहत नाही.

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, फिनलँड यांनी श्वानांची शेपूट कापण्याबाबत कडक कायदे केले आहेत. श्वानांचे शेपूट कापणे आता बेकायदेशीर आहे. परंतु, भारतात याला कोणतेही बंधन नाही. अलीकडे पोलिस खात्यातील गुन्हेगार तपासणी विभागाकडे अशी श्वान दिसतात ज्यांच्या शेपट्या कापलेल्या असतात. संरक्षक (गार्ड) श्वानांना हल्लेखोर शेपूट पकडून खेचू शकतो म्हणून शेपूट कापली जाते.

जाणून घ्या - खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय भूकंप?, भाजपच्या अनेक नेत्यांची हाताला घड्याळ बांधण्याची तयारी

हे आहेत प्रमुख कारण

  • श्वानांची शेपूट त्यांना इजा होण्यापासून वाचवण्यासाठी कापली जाते.
  • धावताना शेपूट हालत असते त्यामुळे त्याला दुखापत होऊ शकते.
  • श्वानाची शेपूट कापल्याने त्यांचा कणा हा बळकट होतो.
  • श्वानाल धावताना वेग वाढवता येतो, इजा टाळण्यास मदत होते.
  • आधुनिक काळात त्यांना अधिक सुंदर बनविण्यासाठी असे केले जाते.
  • श्वानाची शेपूट कापल्यामुळे श्वान चपळ बनतो
  • त्यांचा स्वभाव क्रूर व रागीट बनतो.
  • ते पक्के कडक शिकारी बनतात.
  • बाहेरच्या माणसाला जवळ फिरकू देत नाहीत

अधिक माहितीसाठी - एक लक्षात ठेवा! राष्ट्रवादी आता राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष; शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी दिला इशारा

ही निव्वळ क्रूरता
मागील काही वर्षांपासून श्वानांची शेपूट कापण्याची जणू फॅशनच सुरू झाली आहे. प्रत्येक व्यक्ती आपला श्वान अधिक चांगला आणि वेगळा दिसावा यासाठी शेपूट कापत असतात. याला दुसरे कोणतेही कारण नाही. मात्र, यामुळे श्वानांना त्रास होतो. ते नैराश्यात जातात. याचा त्यांना नाहक त्रास होतो. श्वानांची शेपूट कापने कायद्याने गुन्हा आहे. कुणीही श्वानाची शेपूट कापू नये असे मी आवाहन करतो.
- स्वप्नील बोधाने,
पशुकल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे