कोरोना रुग्णांची वाढ काही थांबेना; नागपुरात अबतक 553

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात कार्यरत आणखी एका डॉक्‍टरला कोरोनाची लागण झाली. शहरात नंदनवन, सदर आणि लोकमान्यनगर या नवीन वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे येथील नागरिकांनामध्येही भयाचे वातावरण पसरले आहे. आज एकूण 13 रुग्ण आढळल्याने बाधितांचा आकडा 553 वर पोहोचला आहे. 

नागपूर : शनिवारचा दिवस कोरोनाच्या उद्रेकाचा दिवस ठरला. एकाच दिवशी दोघे दगावले तर 20 जणांना कोरोनाची लागण झाली. रविवारीदेखील अकोल्यातील महिला मेयोत दगावली तर आमदार निवास विलगीकरण कक्षात सेवा देणाऱ्या एका डॉक्‍टर, आरोग्य कर्मचाऱ्यासह 19 जणांना कोरोनाच्या विषाणूने विळख्यात घेतले होते. सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आलेल्या अहवालात एकूण तेरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता शहरातील बाधितांची संख्या 553 वर पोहोचली आहे. 

पाच दिवसांपूर्वी नरेंद्रनगर येथील रहिवासी असलेल्या आणि आमदार निवास विलगीकरणात सेवा दिलेल्या महिला डॉक्‍टरला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. त्यानंतर रविवारला (ता. 31) आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात कार्यरत आणखी एका डॉक्‍टरला कोरोनाची लागण झाली. शहरात नंदनवन, सदर आणि लोकमान्यनगर या नवीन वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे येथील नागरिकांनामध्येही भयाचे वातावरण पसरले आहे. आज एकूण 13 रुग्ण आढळल्याने बाधितांचा आकडा 553 वर पोहोचला आहे.

अधिक माहितीसाठी - नागपुरात एकाच दिवशी दोघांचा मृत्यू... हा परिसर ठरला चौथा हॉटस्पॉट

नरेंद्रनगरातील दुसरा डॉक्‍टर

आमदार निवासात रात्र पाळीला सेवा देणाऱ्या एका 40 वर्षीय डॉक्‍टरलाही कोरोना विषाणूची बाधा असल्याचे रविवारी पुढे आले. यापूर्वीची बाधित डॉक्‍टही नरेंद्रनगर येथील असल्याने नरेंद्रनगरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय नंदनवन येथील रहिवासी तर आमदार निवासात दिवस पाळीत कार्यरत एका 43 वर्षीय आरोग्य कर्मचारीदेखील कोरोनाबाधित असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. या दोघांच्याही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात आलेले विलगीकरणातील 2 डॉक्‍टर, 2 डाटा एन्ट्री ऑपरेटरसह काही जणांचे नमुने घेण्यात आले. ते नमुने निगेटिव्ह आहे. तर काहींचे नमुने सोमवारी तपासले जातील. 

उपराजधानीत 68 टक्के कोरोनामुक्त

उपराजधानीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत मेयो, मेडिकलमधून यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या गतीने वाढत आहे, हे सुखद चित्र नागपूर शहरात दिसते. आजपर्यंत एकूण 540 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी मेडिकल, मेयो, एम्समध्ये यशस्वी उपचारातून 380 जण कोरोनामुक्त झाले. तर 11 जण आजपर्यंत दगावले आहेत. शहरात आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 68 टक्के आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen new patients found in Nagpur