
कोरोनाच्या नियंत्रणासाठी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावले. परंतु, त्यानंतरही बाधितांची संख्या वाढत आहे. एकूण १० हजार ९७८ चाचण्यांचे अहवाल आले. यातील १ हजार ७० जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
नागपूर ः गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी हजारावर नवे बाधित आढळून आले. काल, बुधवारी १ हजार १५२ तर आज नव्या १ हजार ७० जणांना कोरोनाची बाधा झाली. गेल्या २४ तासांत आठ बळी ठरले. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या ३० हजारांवर गेली.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावले. परंतु, त्यानंतरही बाधितांची संख्या वाढत आहे. एकूण १० हजार ९७८ चाचण्यांचे अहवाल आले. यातील १ हजार ७० जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यात शहरातील ८४५ तर ग्रामीण भागातील २२३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील केवळ दोघे बाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १ लाख ५३ हजार ८८२ एवढी झाली. आता ग्रामीण भागातील बाधितांची संख्या ३० हजारांवर पोहोचली. शहरातील १ लाख २२ हजार ७२९ एकूण बाधित आहेत. जिल्ह्याबाहेरील एकूण बाधितांची संख्या ९५३ पर्यंत पोहोचली.
पत्नीला मंगळ नसणे हे घटस्फोटाचे कारण नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका
दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये ८ मृत्यूची नोंद करण्यात आली. यात शहरातील चार जणांचा समावेश असून ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. बळींचा एकूण आकडा आता ४ हजार ३६५ झाला आहे. यामध्ये शहरातील २ हजार ८१७ तर ग्रामीणमधील ७७७ बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्याबाहेरील ७७१ जणांचा शहरात मृत्यू झाला. दरम्यान, शहरात आज ७२७ बाधित कोरोनातून मुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ३९ हजार ८८६ पर्यंत पोहोचली. परंतु, रुग्ण बरे होण्याचा दर मात्र घसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ९१ वर असलेला दर आज त्याखाली आला. शहरातील १ लाख १२ हजार ७७१ बाधित बरे झाले असून ग्रामीण भागातील २७ हजार ११५ जण बरे झाले.
मॉर्निंग वॉकला गेल्या चार महिला, पण कारनं धडक दिली अन् सर्वच संपलं
सक्रिय रुग्णांत ३३६ ने वाढ
सातत्याने वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे सक्रिय रुग्णांमध्येही वाढ होत आहे. आज नव्या ३३६ रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात एकूण ९ हजार ६३१ सक्रिय रुग्ण आहेत. यातील सात हजार ५१ रुग्ण घरी उपचार घेत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ