esakal | नागरिकांनो तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या नेटवर्कचे हजारो टॉवर्स आहेत अनधिकृत: नागपूर महापालिकेचा धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Thousands of mobile towers in Nagpur are illegal said NMC latest news

मोबाईल आता प्रत्येकाचीच गरज झाली आहे. मोबाईलला रेंज मिळावी, यासाठी शहराच्या प्रत्येक चौकात तसेच घरांवर मोबाईल टॉवर दिसून येत आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे हजारावर मोबाईल टॉवर आहेत

नागरिकांनो तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या नेटवर्कचे हजारो टॉवर्स आहेत अनधिकृत: नागपूर महापालिकेचा धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः शहरात वेगवेगळ्या कंपन्यांचे हजारावर मोबाईल टॉवर उभे आहेत. परंतु हे मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेनेच ही माहिती दिल्याने शहरात कुणाच्या आशीर्वादाने मोबाईल टॉवर उभे आहेत?, या अनधिकृत मोबाईल टॉवरवर पालिका कारवाई का करत नाही?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

मोबाईल आता प्रत्येकाचीच गरज झाली आहे. मोबाईलला रेंज मिळावी, यासाठी शहराच्या प्रत्येक चौकात तसेच घरांवर मोबाईल टॉवर दिसून येत आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे हजारावर मोबाईल टॉवर आहेत. विशेष म्हणजे पालिकेने काही कंपन्यांना चौकात मोबाईल टॉवर उभे करण्यासाठी परवानगीच नव्हे तर जागाही दिली आहे. यातून मनपाला उत्पन्नही मिळत आहे. याशिवाय अनेक बहुमजली इमारतीवरही मोबाईल टॉवर उभे आहेत. परंतु नागपूर महापालिकेने अद्याप कोणतेही मोबाईल टॉवर अधिकृत केले नाही, अशी माहिती धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

जाणून घ्या - सोन्याचे भाव माहिती आहे का? तब्बल इतक्या रुपयांची झाली घसरण

जुना भंडारा मार्गावरील शास्त्रीनगर येथील रहिवासी राजेश बोठारे यांनी माहिती अधिकारात महापालिकेअंतर्गत अधिकृत मोबाईल टॉवरची संपूर्ण यादी पालिकेच्या नगर रचना विभागाला मागितली होती. यातूनच शहरातील मोबाईल टॉवर अधिकृत नसल्याचे पुढे आहे. पालिका नगर रचना विभागातील माहिती अधिकारी व उपअभियंता श्रीकांत देशपांडे यांनी बोठारे यांना मोबाईल टॉवर अद्याप अधिकृत केले नसल्याची माहिती दिली. 

देशपांडे यांनी दिलेल्या माहितीमुळे शहरात हजारांवर उभे असलेले मोबाईल टॉवर कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात उभे असलेल्या या अनधिकृत मोबाईल टॉवरवर पालिका का कारवाई करीत नाही? नगर रचना विभागाच्या उपअभियंत्याने दिलेली माहिती खोटी आहे? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

अधिक वाचा - नागपुरात प्रशासनाचे धाबे दणाणले: इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या युवकामुळे तब्बल १० जण पॉझिटिव्ह; नमूने पुण्याच्या एनआयव्हीकडे

नगर रचना विभाग संभ्रमात?

शहरात चौक, उद्याने तसेच मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहेत. विशेष काही कंपन्यांच्या मोबाईल टॉवरला पालिकेने परवानगी दिली असून यातून उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे काही कंपन्यांसोबत पालिकेनेच करार केला असल्याचे सूत्राने नमूद केले. त्यामुळे नगर रचना विभागाने सर्व टॉवर अद्याप अधिकृत केले नाही, अशी माहिती का दिली? नगर रचना विभाग मोबाईल टॉवरच्या परवानगीबाबत अंधारात तर नाही? की मोबाईल टॉवरच्या परवानगीची माहिती नागरिकांपासून लपवून ठेवण्याचा तर डाव नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोबाईल टॉवरमधून निघणारे रेडिएशन तीव्र असते, त्यामुळे कॅन्सर, ट्यूमरसारखे असाध्य रोग होण्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. याशिवाय पक्षी, पर्यावरणालाही धोका असल्याचे तज्ज्ञ वारंवार स्पष्ट करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top